Sachin Tendulkar & Shane Warne Twitter /ANI
क्रीडा

Shane Warne Demise: मास्टर ब्लास्टर झाला भावूक, म्हणाला...वॉर्नी तुझी आठवण येईल'

शेन वॉर्नच्या (Shane Warne) निधनाबद्दल सचिन तेंडुलकरने शोक व्यक्त केला आहे.

दैनिक गोमन्तक

शेन वॉर्नच्या निधनाबद्दल सचिन तेंडुलकरने शोक व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियन स्पिनरच्या मृत्यूवर सचिनने ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. सचिन आणि शेन वॉर्नची कारकीर्द तीन वर्षांच्या अंतराने सुरु झाली. परंतु दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूवर भारतीय फलंदाजांचा बहुतांश वेळ वरचष्मा होता. शेन वॉर्नचे (Shane Warne) 4 मार्च रोजी वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. सुट्टीसाठी तो थायलंडला गेला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. त्याच्या मॅनेजमेंट टीमने ही माहिती दिली आहे. (Sachin Tendulkar mourns Shane Warne's death)

दरम्यान, महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या शेन वॉर्नच्या निधनावर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हणाला की, ''तुझी आठवण सतत येत राहील. भारत आणि भारतीयांसाठी तु स्पेशल होतास. मैदानावरील आपली स्पर्धा आणि मैदानाबाहेरचे आपले विनोद मला नेहमीच आठवतील. तु भारतासाठी नेहमीच खास राहीला.''

दरम्यान, शेन वॉर्नने 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिली कसोटी भारताविरुद्ध त्याने खेळली होती. त्याने ऑस्ट्रेलियासाठी (Australia) 145 कसोटी सामने खेळला त्यामध्ये त्याने 708 विकेट घेतल्या. त्याच्या पुढे फक्त श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आहे, ज्याने 800 विकेट्स घेतल्या आहेत. 2007 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका क्रिकेटने मुरली आणि वॉर्नच्या नावावर वॉर्न-मुरलीधरन ट्रॉफीचे नाव दिले होते. शेन वॉर्नने 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 293 विकेट घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT