Sachin Tendulkar liked this young fast bowler of India, said a big thing in praise

 

Dainik Gomantak

क्रीडा

भारताच्या या युवा वेगवान गोलंदाजचं सचिन तेंडुलकरने केलं कौतुक

दैनिक गोमन्तक

सचिन तेंडुलकर हा जगातील महान फलंदाजांपैकी एक मानला जातो. जेव्हा तो खेळायचा तेव्हा तो समोरच्या खेळाडूला बघून त्याच्याबद्दल सांगत असे. पुढचा चेंडू कोणता गोलंदाज टाकणार याचीही कल्पना सचिनला होती. त्याच्या क्रिकेटबद्दलच्या आकलनावर कोणीही शंका घेऊ शकत नाही आणि त्याचप्रमाणे तो तरुण खेळाडूंनाही खूप ओळखतो. सचिनकडून कौतुक मिळणे ही कोणत्याही युवा खेळाडूसाठी मोठी गोष्ट असते. भारताच्या युवा खेळाडूंच्या प्रतिभेबद्दल तो सतत बोलत असतो. जसप्रीत बुमराहपासून ते पृथ्वी शॉपर्यंत त्यांनी वेळोवेळी सल्ले दिले आहेत. आता सचिनने भारताच्या आणखी एका खेळाडूचे जोरदार कौतुक केले आहे. सचिनने आता भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे कौतुक केले आहे.

सचिनने (Sachin Tendulkar) सिराजचे वर्णन झटपट शिकणारा असे केले आहे. सचिनने सिराजची ऊर्जा आणि देहबोलीचे कौतुक केले आहे. अलीकडच्या काळात सिराजने मिळवलेल्या यशामागे हे दोन गुण हे एक कारण असल्याचे सचिनने म्हटले आहे. सिराजने (Mohammed Siraj) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पदार्पण केले आणि तेव्हापासून त्याने खूप प्रभावित केले. त्याच्या चेंडूंनी इंग्लंड दौऱ्यातही कहर केला होता.

या गोष्टी आवडतात

'बॅकस्टेज विथ बोरिया' या कार्यक्रमात सचिन सिराजबद्दल म्हणाला, "त्याच्या पायात स्प्रिंग आहे आणि मला ते बघायला आवडते. त्याची धावपळ… तुम्ही बघू शकता की तो खूप उत्साही आहे. तो असा गोलंदाज आहे की दिवसाचे पहिले षटक आहे की शेवटचे षटक पाहिल्यास कळणार नाही. तो नेहमी तुमच्यावर वर्चस्व गाजवेल. तो एक योग्य वेगवान गोलंदाज आहे आणि त्याची देहबोली खूप सकारात्मक आहे. मला या गोष्टी खरोखर आवडतात. तो खूप वेगाने शिकतो.”

सिराजने दिली प्रतिक्रिया

सचिनने केलेली स्तुती सिराजच्या कानावरही पोहोचली असून यावर सिराजने आपली प्रतिक्रिया दिली आहे. सिराजने ट्विट केले की, सचिन सर या कौतुकाबद्दल धन्यवाद. तुमच्याकडून असे कौतुक मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. मी माझ्या देशासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेन. निरोगी राहा सर."

आतापर्यंतचे करिअर

आयपीएलमध्ये सिराजने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. तो सनरायझर्स हैदराबादमध्ये खेळायचा आणि इथून पुढे त्याची वाटचाल सुरू झाली. त्यानंतर तो पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गेला. तिथेही त्याने खूप प्रभावित केले. त्याचा टीम इंडियाचा प्रवास टी-20 पासून सुरू झाला. त्याने 4 नोव्हेंबर 2017 रोजी राजकोट येथे न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला दोन वर्षे लागली. त्याने 15 जानेवारी 2019 रोजी अॅडलेडमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने मेलबर्नमध्ये कसोटी पदार्पणही केले. गेल्या वर्षी बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातून त्याने कसोटी पदार्पण केले होते. सिराजने आतापर्यंत भारतासाठी 10 कसोटी सामने खेळले असून 33 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याचे विकेट्सचे खाते उघडलेले नाही, तर चार टी-20 सामन्यांमध्ये त्याच्या नावावर चार विकेट्स आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT