Ruturaj Gaikwad 
क्रीडा

IND vs AUS: ऋतुराजचा T20 मध्ये मोठा धमाका! केएल राहुल, विराटला पछाडत 'या' विक्रमात बनला 'नंबर वन'

Ruturaj Gaikwad: ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या टी20 सामन्यात खेळताना ऋतुराज गायकवाडने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

India vs Australia, 4th T20I Match at Raipur, Ruturaj Gaikwad Record:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा सामना रायपूरमध्ये झाला. या सामन्यात खेळताना भारताचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने एक मोठा विक्रम केला आहे.

या सामन्यात सलामीला खेळायला आलेल्या ऋतुराजने संयमी सुरुवात केली होती. पण चांगल्या सुरुवातीनंतर त्याला मागच्या सामन्याप्रमाणे यावेळी मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो 28 चेंडूत 32 धावांची खेळी करून बाद झाला. मात्र, या खेळी दरम्यान त्याने टी20 कारकिर्दीत 4000 धावांचा टप्पा पार केला.

ऋतुराज टी20 क्रिकेटमध्ये 25 वा भारतीय ठरला. पण या 25 खेळाडूंमध्ये तो सर्वात कमी डावात 4000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 116 टी20 डावात 4000 धावा पूर्ण केल्या आहेत.

त्यामुळे त्याने सर्वात कमी डावात 4000 टी20 धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत केएल राहुल आणि विराट कोहलीला मागे टाकले आहे. केएल राहुलने 117 टी20 डावात 4000 धावा केल्या होत्या, तर विराटने 138 टी20 डावात 4000 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता या विक्रमाच्या यादीत केएल राहुल दुसऱ्या आणि विराट तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

दरम्यान, सर्वात कमी डावात 4000 टी20 धावा करणाऱ्या जगातील एकूण क्रिकेटपटूंमध्ये ऋतुराजने चौथ्या क्रमांकावर असलेल्या डेवॉन कॉनवेची बरोबरी केली आहे. कॉनवेने देखील 116 डावातच टी20 क्रिकेटमध्ये 40000 धावा पूर्ण केल्या होत्या.

  • सर्वात कमी डावात 4000 टी20 धावा करणारे पहिले पाच फलंदाज

    • 107 डाव - ख्रिस गेल

    • 113 डाव - शॉन मार्श

    • 115 डाव - बाबर आझम

    • 116 डाव - डेवॉन कॉनवे

    • 116 डाव - ऋतुराज गायकवाड

    • 117 डाव - केएल राहुल

ऋतुराजच्या टी20 धावा

ऋतुराजने 121 टी20 सामन्यातील 116 डावात खेळताना 4025 धावा केल्या आहेत. यातील 18 सामने त्याने भारतीय संघासाठी खेळले असून त्यात त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकांसह 490 धावा केल्या आहेत.

तसेच त्याने 52 सामने आयपीएलमध्ये खेळले असून एक शतक आणि 14 अर्धशतकांसह 1797 धावा केल्या आहेत. तसेच इतर 50 सामने त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील आणि इतर स्पर्धांमध्ये खेळले असून त्यात त्याने 1738 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT