Ross Taylor dainik gomantak
क्रीडा

Ross Taylor : शेवटच्या एकदिवसीय सामन्यात रॉस टेलर भावूक; राष्ट्रगीतादरम्यान आले अश्रू

Ross Taylor Retirement: शेवटच्या वनडेत तिन्ही मुलं एकत्र

दैनिक गोमन्तक

वेलिंग्टन : न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रॉस टेलर हा सोमवारी (४ एप्रिल) त्याचा शेवटचा एकदिवसीय सामाना खेळण्यासाठी मैदानात उतरला. मात्र आजचा दिवस त्याच्यासाठी जड जाताना दिसत आहे. आजचा हा त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना असून तो सामन्यादरम्यान भावूक होताना दिसला. राष्ट्रगीत सुरू असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैदही झाला. (Ross Taylor gets emotional during national anthem in last ODI for New Zealand)

रॉस टेलरने गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International cricket) आपण निवृत्ती घत असल्याचे जाहीर केले होते. ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्सविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर आपण एकदिवसीय सामान्यांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे त्याने सांगितले होते. तर बांगलादेशविरुद्धची मायदेशातील कसोटी मालिका ही त्याची शेवटची कसोटी असेल असेही त्याने घोषित केले होते.

दरम्यान घरच्या मैदानावर नेदरलँड विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू असून रॉस टेलरचा (Ross Taylor) आजचा हा शेवटचा सामना आहे. न्यूझीलंडने या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत. तिसर्‍या सामन्यात राष्ट्रगीत (National anthem) सुरू असताना रॉस टेलर भावूक झाला होता. तेव्हा त्याच्यासोबत अॅडलेड, जॉन्टी आणि मॅकेन्झी ही त्याची तिन्ही मुले सोबत होती. नेदरलँड्सविरुद्धच्या मालिकेतील हा शेवटचा एकदिवसीय सामना हॅमिल्टनच्या सेडॉन पार्क स्टेडियमवर खेळला गोला. ज्यात टेलर 14 धावा करून झेलबाद झाला.

शेवटचा कसोटीतही तो भावूक झाला होता

रॉस टेलरने या वर्षी ९ जानेवारीपासून क्राइस्टचर्चमध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) सर्वात यशस्वी कसोटी फलंदाज टेलर अखेरचा पांढऱ्या जर्सीमध्ये न्यूझीलंडकडून खेळताना दिसला. यादरम्यान ही तो भावूक झाला होता.

450 आंतरराष्ट्रीय सामने

रॉस टेलरने आतापर्यंत 450 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात 112 कसोटी (Test), 236 एकदिवसीय आणि 102 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आहेत. टेलरने कसोटी सामन्यात 44.66 च्या सरासरीने 7683 धावा केल्या आहेत. ज्यात 19 शतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, त्याच्या नावावर एकदिवसीय (ODI) आंतरराष्ट्रीय (शेवटच्या सामन्यापूर्वी) 47.73 च्या सरासरीने 8593 धावांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये टेलरने 122.37 च्या स्ट्राईक रेटने 1909 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT