Simona Halep Dainik Gomantak
क्रीडा

Simona Halep: डोपिंगच्या आरोपातील निलंबन हालेपच्या अंगलट, अमेरिकन ओपन स्पर्धेतून झाली बाहेर

US Open 2023: दोन वेळची ग्रँडस्लॅम विजेती टेनिसपटू सिमोना हालेप हिला यावर्षीच्या अमेरिकन ओपनमधून बाहेर व्हावे लागले आहे.

Pranali Kodre

Romanian Tennis player Simona Halep dropped from the U.S. Open because of provisional doping suspension:

रोमानची स्टार टेनिसपटू सिमोना हालेपला 28 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेला मुकावे लागणार आहे. तिच्यावर डोपिंग प्रकरणात तात्पुरती बंदी घातण्यात आल्याने या स्पर्धेत खेळता येणार नाही.

अमेरिकन टेनिस असोसिएशनने याबद्दल माहिती दिली आहे की ती या स्पर्धेतून आपोआपच बाहेर झाली आहे.

गेल्यावर्षी अमेरिकन स्पर्धेवेळी हालेपच्या डोप टेस्टमध्ये प्रतिबंधित पदार्थ सापडल्याने तिचे इंटरनॅशनल टेनिस इंटिग्रिटी एजन्सीकडून निलंबन करण्यात आले होते.

तिच्या सॅम्पलमध्ये रोक्साडुस्टेट पदार्थ सापडला होता. युरोपियन युनियनमध्ये रोक्साडुस्टेट ड्रगचा वैद्यकिय वापर केला जातो. किडनीच्या आजारासाठी या ड्रगच वैद्यकिय वापर केला जातो. तसेच साकलिस्ट आणि लांब पल्ल्याचे धावपटूंकडून डोपिंगसाठी हे ड्रग वापरले जाते.

त्यानंतर मे महिन्यात हालेपवर दुसऱ्यांदा डोपिंगचा आरोप केला गेला. तिच्या ऍथलिट बायोलॉजिकल पासपोर्टमधील अनियमिततेच्या कारणाने तिच्यावर दुसऱ्यांदा डोपिंगचा आरोप झाला आहे.

31 वर्षीय हालेप माजी अव्वल क्रमांकाची टेनिसपटू राहिली आहे. तिने 2018 साली फ्रेंच ओपन आणि 2019 साली विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे. तसेच तिने अनेक विजेतीपदेही जिंकली आहेत.

दरम्यान अमेरिकन ओपनमध्ये महिलांच्या एकेरी स्पर्धेतून हालेप बाहेर झाल्याने तिच्या जागी मेन ड्रॉमध्ये टेलर टाउनसेंडला प्रवेश देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT