Doping: धक्कादायक! भारताच्या आणखी एका आंतरराष्ट्रीय क्रीडापटूवर डोपिंगमुळे निलंबनाची कारवाई

मागील काही दिवसांमध्ये भारतीय क्रीडापटूंवर डोपिंगमुळे बंदी घालण्यात आल्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.
Sanjita Chanu
Sanjita ChanuDainik Gomantak
Published on
Updated on

Sanjita Chanu 4-year ban: गेल्या काही दिवसात भारतीय क्रीडापटूंवर डोपिंगमुळे बंदी घालण्यात आल्याचे प्रमाण वाढले आहे. भारताच्या आणखी एका आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या क्रीडापटूवर डोपिंगमुळे चार वर्षांची बंदी टाकण्यात आली आहे.

गेल्या वर्षी डोपिंगमध्ये अडकलेल्या आणि दोन वेळच्या राष्ट्रकुल विजेत्या वेटलिफ्टर संजिता चानूवर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीच्या (नाडा) शिस्तभंग पॅनेलने चार वर्षांची बंदी टाकली आहे. वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीद्वारे बंदी टाकलेल्या ड्रोस्टॅलोन मेटाबोलिक या ऍनाबॉलिक स्टेरॉईडचे सेवन केल्याबद्दल 29 वर्षीय संजिता चानूवर बंदी टाकण्यात आली आहे.

Sanjita Chanu
अँटी डोपिंग चाचणीत दोषी अढळल्याने सुमित मलिकचे निलंबन

गेल्या वर्षी गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिचे नमुने घेतले होते. खोडा एडीडीपी समितीने नाडाच्या अँटी डोपिंग नियमांचा भंग केल्याबद्दल चानूवर चार वर्षांची बंदीचा निर्णय घेतला गेला आहे. याआधी 12 नोव्हेंबरपासून तिच्यावर तात्पुरती बंदी टाकण्यात आली होती. पण आता तिला चार वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले आहे.

Sanjita Chanu
Dutee Chand: स्टार भारतीय धावपटूवर मोठे संकट! डोप टेस्ट पॉझिटिव्ह येताच निलंबनाची कारवाई

यापूर्वी भारताची स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिच्यावरही डोपिंगच्या आरोपाखाली तब्बल 21 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. तिच्यावर प्रतिबंधित पदार्थ सेवनाचा आरोप आहे. साल 2016 मध्ये झालेल्या रियो ऑलिम्पिकमध्ये ती चौथ्या क्रमांकावर राहिली होती. ती ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट आहे.

तसेच भारतीय धावपटू द्यूती चंद देखील काही दिवसांपूर्वीच डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळली होती. त्यामुळे तिच्यावरही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com