Rohit Sharma | Glenn Maxwell Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: थोडक्यात वाचला! हिटमॅनचा 'तो' शॉट अन् मॅक्सवेलला गेला असता वर्ल्डकपमधून बाहेर

Rohit Sharma Wicket: रोहित शर्माने चेंडू फटकावला अन् थेट मॅक्सवेलच्या हातात विसावला; कॅच पाहून सर्वच चकीत

Pranali Kodre

India vs Australia, 3rd ODI at Rajkot, Rohit Sharma Wicket:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना बुधवारी पार पडला. राजकोटला झालेल्या या सामन्यात भारताला 66 धावांनी पराभवाचा धक्का बसला. दरम्यान, या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माची विकेट चर्चेचा विषय ठरली.

झाले असे की ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 353 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सलामीला ७४ धावांची भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली.

मात्र वॉशिंग्टन सुंदर 18 धावांवर बाद झाला. पण त्यानंतरही रोहितने विराट कोहलीला साथीला घेत धावांचा ओघ सुरू ठेवला होता. या दोघांमध्येही अर्धशतकी भागीदारी झाली होती.

मात्र, याचवेळी शतकाकडे वाटचाल करत असताना ग्लेन मॅक्सवेलने रोहितला बाद केले. दरम्यान, त्याची विकेट सर्वांना चकीत करणारी ठरली. झाले असे की 21 व्या षटकात मॅक्सवेल गोलंदाजी करत होता. या षटकातील त्याने टाकलेल्या अखेरच्या चेंडूवर रोहितने सरळ जोरदार फटका मारला.

याचवेळी मॅक्सवेलने चपळाई चेंडू आवडण्यासाठी हात घातला. मात्र, तो चेंडू त्याच्या हातात विसावला आणि झेल झाला. दरम्यान, हा झेल घेताना थोडी जरी चूक मॅक्सवेलकडून झाली असती, तर कदाचीत तो चेंडू त्याला मोठी दुखापत होऊ शकली असती.

त्यातच वर्ल्डकप तोंडावर असताना त्याला जर दुखापत झाली असती, तर तो ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का ठरला असता. मात्र, सुदैवाने मॅक्सवेल वाचला, पण त्याचबरोबर त्याने रोहितला शानदार झेलही घेतला.

रोहित 57 चेंडूत 81 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर विराट कोहलीही 56 धावांची खेळी करून बाद झाला, तर श्रेयस अय्यरलाही मॅक्सवेलने 48 धावांवर बाद केले. यानंतर कोणाला फार काही करता आले नाही आणि भारतीय संघ 49.4 षटकात 286 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 352 धावा केल्या.ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 96 धावांची खेळी केली. तसेच स्टीव्ह स्मिथने 74 धावांची खेळी केली,तर डेव्हिड वॉर्नरने 56 धावा आणि मार्नस लॅब्युशेन 72 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT