ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्ये भारताच्या आशा पुन्हा एकदा धुळीला मिळाल्या. रविवारी ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. हा जेतेपदाचा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळला गेला. WTC फायनलमध्ये भारताचा सलग दुसरा पराभव झाला आहे.
दरम्यान, पहिल्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून 8 विकेटने पराभव झाला होता. त्यावेळी टीम इंडियाची कमान विराट कोहलीच्या हातात होती. 2021 मध्ये, अंतिम सामना साउथम्प्टन, इंग्लंड येथे खेळला गेला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने WTC फायनलमध्ये तीन बदल सुचवले आहेत. आता इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) रोहितच्या मागणीची अंमलबजावणी करणार की नाही हे पाहण्यासारखे आहे.
रोहितने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, WTC फायनल केवळ जून महिन्यात आणि इंग्लंडमध्ये होऊ नाही. एका सामन्याऐवजी तीन सामन्यांची मालिका अंतिम फेरीसाठी ठेवली पाहिजे, असेही तो म्हणाला. रोहित पुढे म्हणाला की, केवळ जून महिन्यातच WTC फायनल खेळू नये. ही फायनल जगात कुठेही खेळली जाऊ शकते. केवळ इंग्लंडमध्येच खेळणे आवश्यक नाही."
तो पुढे असेही म्हणाला की, "मला डब्ल्यूटीसी फायनल 3 कसोटी सामन्यांची मालिका झाली तर आवडेल. आम्ही खूप मेहनत केली, खूप संघर्ष केला आणि इथपर्यंत पोहोचलो. पण आम्ही फक्त 1 सामना खेळलो. मला वाटते पुढील WTC सायकलमधील 3 सामन्यांची मालिका सर्वोत्तम आणि आदर्श असेल."
दुसरीकडे, रोहितने ट्रॉफी न जिंकल्याबद्दल निराशा व्यक्त केली. विशेष म्हणजे, भारताने 10 वर्षांपासून एकही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही. रोहित म्हणाला की, “आम्ही ट्रॉफी जिंकत नाही हे निराशाजनक आणि हृदयद्रावक आहे. मी खूप निराश आहे. खेळाडूही खूप निराश झाले आहेत. पुढील डब्ल्यूटीसी फायनलसाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडले पाहिजेत. ''
तो पुढे म्हणाला की, "पुढील डब्ल्यूटीसी फायनलसाठी सर्वोत्तम खेळाडू कोण असतील हे ठरवावे लागेल. हे खूप महत्त्वाचे आहे. आम्ही या दिशेने निर्णय घेऊ.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.