WTC Final साठी रोहितच्या सल्ल्यावर कमिन्सचं तिखट उत्तर; म्हणाला, 'गोल्ड मेडलसाठी एक शर्यत...'

WTC Final नंतर एकाच गोष्टीबद्दल रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स यांनी एकमेकांच्या विरुद्ध मतं मांडली.
Rohit Sharma | Pat Cummins
Rohit Sharma | Pat CumminsDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma and Pat Cummins opposing views on WTC Final: कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचे विजेतेपद पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन संघाने जिंकले. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर 7 ते 11 जून दरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 209 धावांनी पराभूत करत कसोटी चॅम्पियनशीपच्या गदेवर नाव कोरले.

दरम्यान, या सामन्यानंतर एका प्रश्नाबद्दल भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांनी दोन विरुद्ध प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. सामन्यानंतर कसोटी चॅम्पियनशीचा विजेता ठरवण्यासाठी एकच अंतिम सामना खेळवायला हवा की अंतिम मालिका खेळवायला हवी, याबद्दल दोघांनी विरुद्ध मतं मांडली.

Rohit Sharma | Pat Cummins
गिलसह भारत-ऑस्ट्रेलिया संघावरही ICC ची मोठी कारवाई, WTC 2023 Final मधील 'या' चूका भोवल्या

रोहित म्हणाला, 'मला कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळायला आवडेल. आम्ही खूप मेहनत करतो, लढतो, पण आम्हाला फक्त एकच सामना खेळायला मिळतो. मला वाटते की ती सामन्यांची मालिका पुढील कसोटी चॅम्पियनशीपच्या पर्वासाठी योग्य ठरेल.'

पण पॅट कमिन्स म्हणाला, 'मला वाटते एक मॅच ठिक आहे, यात काहीही शंका नाही. मला वाटते की तुमच्याकडे 50 सामन्यांची मालिका असेल, पण ऑलिम्पिक शर्यतीत सुवर्णपदक मिळवण्यासाठी एकच शर्यत असते. AFL NRL सीजनमध्येही अंतिम सामना होतो, हाच खेळ आहे.'

याशिवाय पॅट कमिन्सने असेही म्हटले की 'इथे येऊन अंतिम सामना जिंकण्यासाठी तुम्हाला जगात सर्वत्र जाऊन विजय मिळवावा लागतो. मला वाटते एका पर्वात साधारण २० सामने होतात. मला वाटते आम्ही २० सामन्यांमधीस केवळ तीन किंवा चार सामन पराभूत झाले असू. आमचे खेळाडू या सर्व सामन्यांमध्ये चांगले खेळले.'

Rohit Sharma | Pat Cummins
घरचे शेर, इंग्लंडमध्ये ढेर! WTC Final मध्ये टीम इंडियाचं कुठे चुकलं? वाचा पराभवाची 5 कारणं

इंग्लंडमध्ये सामना खेळवण्यावर रोहितने विचारला प्रश्न

दरम्यान रोहितने इंग्लंडमध्ये अंतिम सामने खेळण्यावरही प्रश्न उपस्थित केला आहे. कसोटी चॅम्पियनशीपच्या पहिल्या दोन्ही पर्वातील अंतिम सामने इंग्लंडला झाले, या दोन्हीवेळेस भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला. तसेच आयसीसीने यापूर्वीच सांगितले आहे की तिसऱ्या पर्वाचा अंतिम सामना लॉर्ड्सला होणार आहे.

याबद्दल रोहित म्हणाला, 'याप्रकारच्या अंतिम सामन्यासाठी 20-25 दिवसाची तयारी हवी. मागच्यावेळी आम्ही इंग्लंडमध्ये असेच केले आणि परिणाम तुमच्या समोर आहेत. आम्ही कसोटी मालिकेतील अखेरच्या सामना स्थगित होण्याआधी मालिकेत 2-1 असे पुढे होतो. कसोटी क्रिकेटमध्ये शिस्त महत्त्वाची असते. चांगली गोलंदाजी फलंदाजांना आव्हान देऊ शकते.'

'जूनमध्ये अंतिम सामना नाही व्हायला पाहिजे. हा अंतिम सामना वर्षात कोणत्याही वेळी होऊ शकतो आणि फक्त इंग्लंडमध्येच नाही, तर कुठेही होऊ शकतो.'

दरम्यान, कसोटी चॅम्पियनशीपमधील सर्व द्विपक्षीय मालिका मार्च-एप्रिलदरम्यान संपत असल्याने अंतिम सामना जूनमध्ये खेळवण्यात येतो. तसेच इंग्लंडला जूनमध्ये उन्हाळा असतो, तर अन्य देशांमध्ये पावसाळा किंवा खूप थंडी असते. त्यामुळे हा अंतिम सामना इंग्लंडला खेळवला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com