Rohit Sharma | Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: 'वर्ल्डकपमध्ये शर्मा अन् कोहलीही करणार बॉलिंग...', कर्णधार रोहितचं मोठं भाष्य

भारताचा कर्णधार रोहित शर्माने World Cup 2023 मध्ये त्याने व विराट कोहलीने गोलंदाजी करण्याबद्दल मत व्यक्त केले आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma said Hopefully he and Virat Kohli can bowl in Cricket World Cup 2023:

आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समीतीने सोमवारी (21 ऑगस्ट) 17 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेसाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचा अध्यक्ष अजित अगरकर उपस्थित होते. त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

दरम्यान, भारतीय संघासाठी एक मोठी समस्या अशी आहे की भारताच्या पहिल्या 5 फलंदाजांपैकी कोणीही पार्टटाईम गोलंदाजी फारशी करताना दिसत नाही. याबद्दल रोहित आणि अगरकर यांनी पत्रकार परिषदेत गमतीशीर उत्तर दिले आहे.

रोहित म्हणाला, 'पण आशा आहे की शर्मा आणि कोहली वर्ल्डकपमध्ये गोलंदाजीत हात आजमावतील.'

रोहितच्या या वाक्यावर प्रतिक्रिया देताना अजित अगरकर म्हणाला, 'हो, आम्ही त्यांचे मन वळवले आहे.'

रोहित आणि विराट कोहली यांनी यापूर्वी गोलंदाजी केली आहे. पण गेल्या काही काळात ते फारशी गोलंदाजी करताना दिसलेले नाही. रोहितने गोलंदाजी करताना कसोटीत 2 विकेट्स, वनडेत 8 विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1 विकेट घेतली आहे. तसेच विराटने वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर या गोलंदाजांचा समावेश आहे. तसेच हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडूही संघात आहेत.

मात्र, चकीत करणारी गोष्ट अशी की फिरकीपटू युजवेंद्र चहलला या संघातून वगळण्यात आले आहे. याबद्दल रोहितने म्हटले आहे की संघात 17 खेळाडूंसाठीच जागा होती. तसेच चहलसाठी अद्याप वर्ल्डकपसाठी दरवाजे बंद झालेले नाहीत.

आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.

राखीव खेळाडू - संजू सॅमसन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT