Asia Cup 2023: चहलला भारतीय संघात जागा का नाही? कॅप्टन रोहित म्हणतोय, 'दरवाजे बंद...'

Yuzvendra Chahal Dropped: आशिया चषकासाठी निवड झालेल्या भारतीय संघातून युजवेंद्र चहलला वगळण्यामागील कारण कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.
Yuzvendra Chahal | Rohit Sharma
Yuzvendra Chahal | Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Captain Rohit Sharma reveals reason Why Yuzvendra Chahal dropped from India Asia Cup 2023 squad:

आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समीतीने सोमवारी (२१ ऑगस्ट) १७ जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. तिलक वर्माला पहिल्यांदाच वनडे संघात संधी मिळाली असून केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचेही दुखापतीनंतर पुनरागमन झाले आहे.

मात्र, भारतीय संघातून अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलला वगळण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पण यामागील कारण भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.

रोहितने म्हटले आहे की संघात १७ खेळाडूंनाच जागा असते. तसेच चहलला संघात घेतले असते, तर एका वेगवान गोलंदाजाला वगळावे लागले असते आणि वेगवान गोलंदाज आगामी दोन महिन्यात संघात महत्त्वाचे योगदान देऊ शकतात.

Yuzvendra Chahal | Rohit Sharma
Asia Cup 2023 India Squad: भारतीय संघाची घोषणा! तिलकला संधी, तर श्रेयस-केएल राहुलचे पुनरागमन

संघनिवडीनंतर पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, 'आमच्या संघात केवळ १७ खेळाडूंनाच जागा असल्याने आम्हाला चहलला घेता आले नाही. वर्ल्डकपसाठी रवी अश्विन, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर कोणासाठीही दारं बंद झालेली नाहीत.'

याशिवाय भारतीय संघाच्या निवड समीतीचा अध्यक्ष अजित अगरकरनेही चहलला बाहेर करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

तो म्हणाला, 'कामगिरी चांगली आहे, पण आम्हाला संघाचा समतोल राखण्याकडेही लक्ष द्यावे लागते. दोन मनगटी फिरकीपटूंना खेळवणे कठीण आहे. आम्ही केवळ एका मनगटी फिरकीपटूला संधी देऊ शकतो. संघातून बाहेर होणे दुर्दैवी आहे, पण सध्या कुलदीत थोडा आघाडीवर आहे.'

Yuzvendra Chahal | Rohit Sharma
Yuzvendra Chahal: 'RCB ने बाहेर केल्यावर खूप राग आला, पहिल्या मॅचमध्ये तर...' चहलचं मनातलं दु:ख आलं ओठांवर

कुलदीपची गेल्या काही सामन्यांमधील कामगिरी चांगली झालेली आहे. मात्र, चहलला गेल्या काही महिन्यांमध्ये वनडेत फारशी संधी मिळालेली नाही. त्याने २०२३ वर्षात केवळ दोनच वनडे सामने खेळले आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील वनडे मालिकेत त्याचा समावेश होता. मात्र त्याला सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.

राखीव खेळाडू - संजू सॅमसन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com