Asia Cup 2023 India Squad: भारतीय संघाची घोषणा! तिलकला संधी, तर श्रेयस-केएल राहुलचे पुनरागमन

India Squad for Asia Cup 2023: बीसीसीआयने ३० ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
India Squad for Asia Cup 2023
India Squad for Asia Cup 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

BCCI Announced India Cricket Squad for Asia Cup 2023: आशिया चषक 2023 स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी (21 ऑगस्ट) भारतीय संघाची घोषणा केली आहे.

बीसीसीआयने घोषणा केलेल्या आशिया चषकासाठीच्या भारतीय संघात नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला संधी मिळाली आहे.

याशिवाय केएल राहुल, श्रेयस अय्यर यांचेही दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

या 17 जणांच्या संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे, तर उपकर्णधारपद अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे सोपवण्याच आले आहे. याशिवाय संजू सॅमसनला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.

  • भारतीय संघ - रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.

    राखीव खेळाडू - संजू सॅमसन

India Squad for Asia Cup 2023
Asia Cup 2023 मध्ये 20 वर्षीय रोहित करणार नेतृत्व, जेलमध्ये जाऊन आलेल्या क्रिकेटरचाही संघात समावेश

भारतीय संघ श्रीलंकेत खेळणार

आशिया चषकातील सामने पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवले जाणार आहे. पण भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. या स्पर्धेसाठी 23 ऑगस्ट रोजी भारतीय संघ श्रीलंकेला जाण्याची शक्यता आहे.

आशिया चषकात सुपर सिक्स फेरीसाठी भारताचा समावेश ए ग्रुपमध्ये पाकिस्तान आणि नेपाळ संघासह करण्यात आला आहे. तसेच बी ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका संघ आहेत.

सुपर सिक्स फेरीत भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 2 सप्टेंबर रोजी होणार असून 4 सप्टेंबर रोजी नेपाळ संघाविरुद्ध होणार आहे.

तथापि, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आशिया चषकाचे ज्याप्रकारे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, त्यानुसार जर सुपर फोरमध्ये भारत आणि पाकिस्तान संघांनी प्रवेश केला, तर या दोन संघात 10 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे हा सामना होईल.

India Squad for Asia Cup 2023
Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान मॅच तिकिटांच्या थक्क करणाऱ्या किंमती, तरीही काही तासातच 'सोल्ड आऊट'

ही 16 वी आशिया चषक स्पर्धा वनडे क्रिकेट स्वरुपात खेळवली जाणार असून एकूण 13 सामने होणार आहेत. यातील 4 सामने पाकिस्तानमध्ये आणि अंतिम सामन्यासह 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे होणार आहे.

आशिया चषकाचे वेळापत्रक

सुपर सिक्स

  • 30 ऑगस्ट - पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - मुलतान, पाकिस्तान (वेळ: दुपारी 3.30 वाजता)

  • 31 ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - कँडी, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

  • 2 सप्टेंबर - भारत विरुद्ध पाकिस्तान - कँडी, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

  • 3 सप्टेंबर - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - लाहोर, पाकिस्तान (वेळ: दुपारी 3.30 वाजता)

  • 4 सप्टेंबर - भारत विरुद्ध नेपाळ - कँडी, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

  • 5 सप्टेंबर - अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका - लाहोर, पाकिस्तान (वेळ: दुपारी 3.30 वाजता)

सुपर फोर

  • 6 सप्टेंबर - ए1 विरुद्ध बी2 - लाहोर, पाकिस्तान (वेळ: दुपारी 3.30 वाजता)

  • 9 सप्टेंबर - बी1 विरुद्ध बी2 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

  • 10 सप्टेंबर - ए1 विरुद्ध ए2 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

  • 12 सप्टेंबर - ए2 विरुद्ध बी1 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

  • 14 सप्टेंबर - ए1 विरुद्ध बी1 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

  • 15 सप्टेंबर - ए2 विरुद्ध बी2 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

17 सप्टेंबर - अंतिम सामना - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com