Rohit Sharma PTI
क्रीडा

IND vs AFG: रोहित रिटायर्ड आऊट की रिटायर्ट हर्ट? चर्चेला उधाण; काय आहेत सुपर ओव्हरचे नियम?

Rohit Sharma: भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघातील तिसऱ्या टी20 सामन्यातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये रोहित रिटायर्ड आऊट झाला की रिटायर्ड हर्ट यावरून चर्चेला उधाण आले आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma retire out or retire hurt confusion during India vs Afghanistan 3rd T20I, Super Over Rules:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात टी20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (17 जानेवारी) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने दोन सुपर ओव्हरनंतर विजय मिळवत मालिका 3-0 अशी जिंकली. दरम्यान, या सामन्यात पहिल्या सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्माने वापरलेली युक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

या सामन्यात निर्धारित 20-20 षटकानंतर बरोबरी झाली होती. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 212 धावा केल्या होत्या, तर अफगाणिस्ताननेही 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 6 बाद 212 धावा केल्या. त्यामुळे या सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली. यावेळी मुकेश कुमारने भारताकडून गोलंदाजी केली, तर अफगाणिस्तानकडून गुलबदीन नायब आणि रेहमनुल्ला गुरबाज यांनी फलंदाजी केली. मात्र नायब पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला. मात्र नंतर गुरबाज आणि मोहम्मद नबी यांनी 16 धावा केल्या.

त्यानंतर 17 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा उतरले. त्यांनी पहिल्या 5 चेंडूत 15 धावा केल्या होत्या. अखेरच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती. यावेळी अचानक रोहित माघारी परतला. त्यावेळी रोहित रिटायर्ड आऊट झाल्याची चर्चा होती.

अगदी सामना झाल्यानंतर राहुल द्रविडनेही रिटायर्ड आऊटचा उल्लेख केला. बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवरही रोहित रिटायर्ड आऊट झाल्याचा उल्लेख केलेला आहे. अशात त्याच्या या गोष्टीमुळे वाद निर्माण झाला.

बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवरही रोहित रिटायर्ड आऊट झाल्याचा उल्लेख

कारण पहिल्या सुपर ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर जयस्वालला आणि रिंकू सिंगला एकच धाव घेता आली आणि पुन्हा बरोबरी झाली. त्यामुळे दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात येणार होती.

नियमानुसार पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झालेले खेळाडू दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करू शकत नाही. तसेच पहिल्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केलेले गोलंदाज दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करू शकत नाहीत.

त्यामुळे दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानकडून फरिद अहमद आणि भारताकडून रवी बिश्नोईने गोलंदाजी केली. मात्र, पहिल्या सुपर ओव्हरमध्ये रोहित रिटायर्ड आऊट झाला होता, असे मानण्यात येत होते. त्यामुळे दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये तो फलंदाजी करू शकणार नाही, अशी चर्चा होती.

मात्र त्याने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीला येत 11 धावाही केल्या. नंतर अफगाणिस्तानचे दोन विकेट्स तीन चेंडूतच रवी बिश्नोईने घेतल्याने हा सामना भारताने जिंकला.

मात्र, रोहित रिटायर्ड आऊट झाल्यानंतरही दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीला आल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, याबद्दल आयसीसीकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

त्यामुळे त्याच्याबाबतीत पंचांकडून चूक झाली की तो रिटायर्ड हर्ट झाला होता, याबाबत अद्याप साशंकता आहे. कारण रिटायर्ड हर्ट झालेला फलंदाज पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. तो बाद समजला जात नाही. मात्र रिटायर्ड आऊट झालेला फलंदाज बाद समजला जातो.

काय आहेत सुपर ओव्हरचा नियम?

मुख्य सामन्यात ज्या संघाने धावांचा पाठलाग केलेला असतो तो संघ पहिल्या सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करतो. त्यानुसार बुधवारी देखील अफगाणिस्तान संघाने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी केली होती, तर भारताने धावांचा पाठलाग केला होता.

तसेच जर पहिली सुपर ओव्हर बरोबरीत सुटली, तर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पुन्हा आदबाबदली होते, म्हणजेच पहिल्या सुपर ओव्हरमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ पुढच्या सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करतो. हे सामन्याचा निकाल लागेपर्यंत सुरू राहाते.

तसेच सुपर ओव्हर खेळण्यासाठी प्रत्येक संघाला 3 फलंदाज निवडावे लागतात. कारण एका सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाचे दोन विकेट्स गेल्यानंतर त्यांचा डाव संपतो.

याशिवाय पहिल्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज पुढील सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करू शकत नाही. तसेच पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झालेले फलंदाज दुसऱ्या ओव्हरमध्ये फलंदाजी करू शकत नाहीत. पण जर फलंदाज पहिल्या सुपर ओव्हरमध्ये नाबाद राहिला असेल, तर तो दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी पात्र असतो.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की जर दुसरी सुपर ओव्हरही टाय झाली, तर तिसरी सुपर ओव्हर खेळायची की नाही हा निर्णय पंचांवरही असतो. ते सामन्याचा वेळ आणि परिस्थिती पाहून निर्णय घेऊ शकतात. याशिवाय निर्धारित वेळेत बरोबरीत सुटल्यानंतर कोणत्याही कारणाने जर सुपर ओव्हर होऊ शकत नसेल, तर सामना बरोबरीत सुटल्याचे जाहीर केले जाते.

तसेच जर तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सामना गेलाच, तर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केलेले गोलंदाज तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी पात्र ठरतात, तसेच पहिल्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी केलेले फलंदाजही तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पात्र असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT