Rohit Sharma PTI
क्रीडा

IND vs ENG: विजय मिळवूनही रोहित बॅटिंगवर नाराज, म्हणाला, 'माझ्यासह काही खेळाडूंनी...'

Rohit Sharma: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma Reacted on India's Win Against England in ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध इंग्लंड संघात लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात भारताने 100 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 229 धावा केल्या होत्या. त्यानंतर 230 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 34.5 षटकात 129 धावांतच सर्वबाद झाला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत मोलाचा वाटा उचलला. त्याला या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

दरम्यान असे असले तरी रोहितने म्हटले आहे की भारतीय संघाची फलंदाजी आणखी चांगली व्हायला हवी होती. भारताने 40 धावांवरच 3 विकेट्स गमावल्या होत्या.

या सामन्यानंतर रोहित म्हणाला, 'जेव्हा कठीण वेळ येते, तेव्हा आमचे अनुभवी खेळाडू योग्यवेळी उभे राहतात आणि मोलाची कामगीरी करतात. ज्याप्रकारे आमच्यासाठी आत्तापर्यंत स्पर्धा झाली आहे, ते पाहता पहिल्या पाच सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी केली होती, या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाली.'

'आम्हाला समोरून आव्हान मिळाले, त्यांनी चांगली गोलंदाजी केली. आमच्यासाठी त्या खेळपट्टीवर आव्हानात्मक धावसंख्या उभारणे महत्त्वाचे होते. आम्ही आज चांगली फलंदाजी केली नाही. सुरुवातीलाच तीन विकेट्स गमावणे चांगले नव्हते.

'जेव्हा तुम्ही आशा परिस्थितीत आडकता, तेव्हा तुम्ही मोठी भागीदारी करण्याचा प्रयत्न करता, जी आम्ही केली. पण माझ्यासह काही खेळाडूंनी शेवटी विकेट फेकल्या.'

रोहित त्याच्या अर्धशतकी खेळीबद्दल म्हणाला, 'मी फक्त सकारात्मक राहण्याचाच विचार करत होतो. माझ्या क्षेत्रात पडणारा चेंडू मला दूरवर मारायचा होता, तसे केल्याने तुम्ही गोलंदाजावर आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकू शकता. तुम्ही जेव्हा संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, तेव्हा मला वाटले होते की आम्हाला 30 धावा कमी पडल्या आहेत.'

याबरोबरच त्याने भारताच्या गोलंदाजांचेही कौतुक केले. त्यांनी योग्य वेळी विकेट्स घेतल्याने भारताला फायदा झाल्याचे त्याने सांगितले. तसेच संघाच योग्य समतोल झाला आहे, असेही रोहित म्हणाला.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदादी करत इंग्लंडला 129 धावांवरच रोखले. मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या. याबरोबरच कुलदीप यादवने 2 विकेट्स आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.

रोहित म्हणाला, 'मला वाटते हे आमचे सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण आहे. आमच्याकडे चांगला समतोल आहे. चांगले फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज आहेत, त्यांना या परिस्थितीत खेळण्याचा चांगला अनुभव आहे. आमच्याकडे चांगले पर्याय आणि अनुभव आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी चांगल्या धावा करून गोलंदाजांना मदत करणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे ते त्यांची जादू दाखवू शकतात.'

दरम्यान, आता भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला आहे. आता भारताला पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध 2 नोव्हेंबर रोजी मुंबईत खेळायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

SCROLL FOR NEXT