Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: '...पण जडेजाही टी20 खेळत नाहीये', असं का म्हणाला रोहित शर्मा?

India Cricket Team: सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्याबद्दल रोहितने सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma react on resting Him, Virat Kohli and Ravindra Jadeja in T20 Cricket:

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून 5 सामन्यांची टी20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. दरम्यान, या मालिकेच रोहित शर्मासह विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांना संधी मिळालेली नाही.

तसेच रोहित आणि विराट या दौऱ्यातील अखेरच्या वनडे मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यातही खेळले नव्हते. दरम्यान आता सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्याबद्दल रोहितने सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित नुकताच ला लीगाच्या एका कार्यक्रमात आगामी वर्ल्डकपबद्दल बोलला. यावेळी त्याने खेळाडूंना विश्रांती देण्याच्या मुद्दाही अधोरेखित केला.

रोहित म्हणाला, 'गेल्यावर्षी आम्ही अशीच गोष्ट केली होती. टी20 वर्ल्डकप होता, त्यामुळे आम्ही वनडे क्रिकेट खेळलो नव्हतो. आताही आम्ही तेच करत आहोत. वनडे वर्ल्डकप आहे त्यामुळे आम्ही टी20 खेळत नाही.'

'तुम्ही वर्ल्डकपसाठी सज्ज होण्यासाठी सर्व सामने खेळू शकत नाही. आम्ही हे दोन वर्षांपूर्वीच ठरवले होते. जडेजा टी20 खेळत नाहीये, याबद्दल तुम्ही त्याला विचारले? मला फोकस (रोहितवर आणि विराटवर असणाऱ्या) समजतो. पण जडेजाही खेळत नाहीये.'

विराट आणि रोहित हे टी20 वर्ल्डकप 2022 मधील इंग्लंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यानंतर भारताकडून टी20 क्रिकेट खेळलेले नाहीत.

दरम्यान, रोहितने असेही सांगितले की तो वर्ल्डकप जिंकण्यास उत्सुक आहे. तो म्हणाला, 'प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर मी कधीही वनडे वर्ल्डकप जिंकलेलो नाही. वर्ल्डकप जिंकणे हे स्वप्न आहे आणि वर्ल्डकपसाठी लढाई देण्यापेक्षा आणखी काही माझ्यासाठी आनंददायी नाही. '

'तुम्हाला वर्ल्डकप ताटात वाढले जात नाही. तुम्हाला त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. 2011 पासून आम्ही तेच करत आहोत. आम्ही सर्वच त्यासाठी लढत आहोत.'

भारतीय संघाने 2013 नंतर एकदाही आयसीसीची स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे अद्याप भारताला गेल्या 10 वर्षांपासून आयसीसी विजेतेपदाची प्रतिक्षा आहे. वर्ल्डकप 2023 स्पर्धा भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT