Rohit Sharma: 'काहीही झालं तरी एकही मॅच पाहायची नाही...', वर्ल्डकप 2011 बाबत हिटमॅनचा खुलासा

World Cup: रोहित शर्माने 12 वर्षांनंतर भारतात होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Sharma | World Cup 2011
Rohit Sharma | World Cup 2011Dainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma recalls memories of Cricket World Cup 2011:

भारतात 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी वर्ल्डकपची ट्रॉफी जगभरातील विविध देशात फिरवली जात आहे. याचदरम्यान, नुकतीच ही ट्रॉफी अमेरिकेमध्ये फिरवण्यात आलेली. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा देखील अमेरिकेतच होता.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार रोहितने यावर्षी होणाऱ्या वर्ल्डकपबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित म्हणाला, 'मी ट्रॉफी इतक्या जवळून कधीही पाहिली नव्हती. जेव्हा आम्ही 2011 मध्ये जिंकलो, तेव्हाही मी संघाचा भाग नव्हतो. पण हो, ही खूप सुंदर दिसत आहे. अनेक आठवणी या ट्रॉफीच्या मागे आहेत. आशा आहे की आम्ही ही ट्रॉफी उंचावू.'

Rohit Sharma | World Cup 2011
Rohit Sharma Academy: हिटमॅन पदेशातही घडवणार क्रिकेटपटू; अमेरिकेत सुरू केली ॲकेडमी, पाहा Video

यावर्षीच्या वर्ल्डकपमधील सामने भारतातील 10 वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. तसेच 12 वर्षांनी भारतात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी २०११ मध्ये भारतात वर्ल्डकप खेळवण्यात आलेला, ज्या स्पर्धेत भारताने विजेतेपद जिंकले होते.

रोहित म्हणाला, 'मला माहित आहे, आम्ह ज्या मैदानावर जाऊ, तिथे आम्हाला मोठा पाठिंबा मिळणार आहे. ही वर्ल्डकप स्पर्धा आहे, त्यामुळे सर्वजण उत्सुक आहेत. वर्ल्डकप 12 वर्षानी भारतात होत आहे.'

'2011 मध्ये आम्ही इथे वर्ल्डकप खेळलो होतो. त्यानंतर 2016 साली टी20 वर्ल्डकप भारतात झाला, पण वनडे वर्ल्डकप 12 वर्षांनी होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये उत्साह असून भारतात आत्तापासूनच मोठी चर्चा आहे. आम्हीही सर्व ठिकाणी खेळण्यास उत्सुक आहोत.'

Rohit Sharma | World Cup 2011
Rohit Sharma: शार्दुल ठाकूरमुळे कॅप्टन रोहितचा चढला पारा, लाईव्ह सामन्यात वापरले अपशब्द

तसेच वर्ल्डकपमधील आठवणींबद्दल रोहित म्हणाला, '2003 मध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत चांगला खेळला होता. तुम्हाला माहित आहे, सचिन तेंडुलकरने खूप शानदार फलंदाजी केली होती. 2007 वर्ल्डकपमध्ये आम्ही बाद फेरीसाठीही पात्र ठरू शकलो नव्हतो.'

'2011 सालचा वर्ल्डकप आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय होता. मला आठवते मी प्रत्येक सामना, प्रत्येक चेंडू मी घरून पाहिला होता.'

'त्यावेळी दोन प्रकारच्या माझ्यात भावना होत्या. मी त्या संघाला भाग नसल्याने निराश होतो. त्यावेळी मी ठरवले होते की मी वर्ल्डकप पाहाणार नाही, पण नंतर पाहिला. दुसरी आठवण अशी की मला आठवते भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीपासून शानदार कामगिरी केली होती.'

तसेच रोहितने असेही सांगितले की 2015 आणि 2019 वर्ल्डकप स्पर्धेचा तो भाग होता आणि त्याला ही स्पर्धा खेळून छान वाटले. पण त्यावेळी उपांत्य फेरीच्या पुढे भारताला जाता आले नव्हते.

रोहित असंही म्हणाला की आता वर्ल्डकप भारतात होत आहे आणि तुम्ही ही स्पर्धा एक-दोन दिवसात जिंकू शकत नाही, तुम्हाला सातत्याने चांगली कामगिरी करावी लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com