Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

भारतीय क्रिकेटमध्ये ऑल इज नॉट वेल! रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटमधील वादाचे एकामागून एक खुलासे; आणखी एका रिपोर्टनं खळबळ

Selectors Team Management Unhappy Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा याच्या वनडे क्रिकेटमधील भविष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून क्रीडा जगतात उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

Manish Jadhav

Selectors Team Management Unhappy Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा याच्या वनडे क्रिकेटमधील भविष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून क्रीडा जगतात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणारा तिसरा आणि अंतिम वनडे सामना हा रोहित शर्माच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरेल, अशा प्रकारच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला होता. मात्र, आता भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी या सर्व चर्चांना आणि तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला.

सैकिया यांनी स्पष्ट केले की, लॉर्ड्सवर होणारा सामना हा रोहितचा अखेरचा वनडे सामना नसेल. रोहित हा भारतीय वनडे संघाचा एक नियमित आणि महत्त्वाचा सदस्य आहे. तो जोपर्यंत संघात आहे आणि तंदुरुस्त आहे, तोपर्यंत देशाचे प्रतिनिधित्व करत राहील. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या बातम्या केवळ अफवा आहेत.

बीसीसीआयने या चर्चा फेटाळल्या असल्या तरी, 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या एका खळबळजनक रिपोर्टने संघ व्यवस्थापनातील अंतर्गत वादावर प्रकाश टाकला. या रिपोर्टनुसार, निवड समिती आणि संघ व्यवस्थापन सध्या रोहित शर्माच्या काही निर्णयांमुळे नाराज आहे. गेल्या महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेदरम्यान या वादाची ठिणगी पडली होती. युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला संघात संधी देण्यासाठी संघ व्यवस्थापनाने रोहितला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता, मात्र रोहितने चेन्नईतील तिसऱ्या सामन्यात आराम करण्यास स्पष्ट नकार दिला.

परिणामी, विराट कोहली अनुपस्थित असलेल्या या सामन्यात यशस्वीला जागा देण्यासाठी थेट कर्णधार शुभमन गिलला पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावे लागले होते. निवड समितीला रोहितची ही भूमिका आवडली नव्हती आणि त्यांनी तेव्हाच त्याला संघातून बाहेर करण्याचा विचार केला होता, असा दावा बीसीसीआयच्या सूत्रांनी केला.

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापनही रोहित शर्माच्या सध्याच्या कामगिरीवर फारसे समाधानी नाही. गेल्या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदानंतर रोहितच्या जागी शुभमन गिलकडे वनडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले, तेव्हापासून रोहितच्या अडचणी वाढल्या आहेत. आधीच त्याने टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे, त्यामुळे त्याला केवळ वनडे फॉरमॅटमध्ये लय राखणे कठीण जात आहे.

तो देशांतर्गत क्रिकेटमध्येही फारसा खेळत नाही. निवड समितीने आपली कडक भूमिका बोर्डाकडे मांडली असून आता चेंडू रोहित आणि बीसीसीआयच्या (BCCI) कोर्टात आहे. जरी सचिवांनी निवृत्तीच्या बातम्या फेटाळल्या असल्या, तरी सध्याची परिस्थिती पाहता लॉर्ड्सवरील हा सामना रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT