Rohit Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: रोहितचा पुन्हा दिसला 'हिट' अंदाज! 4 षटकार ठोकत रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

India vs New Zealand Semi-Final: वर्ल्डकप 2023 सेमीफायनलमध्ये रोहितने 4 षटकारांसह आत्तापर्यंत कोणालाही न जमलेला विक्रम नावावर केला आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand, Rohit Sharma Sixes Record:

बुधवारी (15 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड संघात पहिला उपांत्य सामना खेळवला जात आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात रोहित शर्माने खास विश्वविक्रम केला आहे.

या सामन्यात रोहितने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला होता. पण त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले. त्याने 29 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 47 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने वर्ल्डकपमध्ये 50 षटकारांचा टप्पा पार केला आहे.

त्यामुळे रोहित हा पहिलाच क्रिकेटपटू आहे, ज्याने वनडे वर्ल्डकपमध्ये 50 हून अधिक षटकार मारले आहेत. रोहितचे आता वनडे वर्ल्डकपमध्ये 27 सामन्यांत 51 षटकार झाले आहेत.

त्याने वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत ख्रिस गेलला मागे टाकले आहे. गेलने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 35 सामन्यांत 49 षटकार मारले आहेत.

  • वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटर

    • 51 षटकार - रोहित शर्मा (27 सामने)

    • 49 षटकार - ख्रिस गेल (35 सामने)

    • 43 षटकार - ग्लेन मॅक्सवेल (25 सामने)

    • 37 षटकार - एबी डिविलियर्स (23 सामने)

    • 37 षटकार - डेव्हिड वॉर्नर (27 सामने)

दरम्यान, रोहित सध्या वर्ल्डकपमध्ये दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आत्तापर्यंत 10 सामन्यांत 550 धावा केल्या आहेत.

रोहित वर्षात सर्वाधिक षटकार मारणाराही खेळाडू

रोहित वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात 60 हून अधिक षटकार मारणाराही क्रिकेटपटू आहे. त्याने 2023 वर्षात वनडेमध्ये 64 षटकार मारले आहेत. या यादीत त्याच्यापाठोपाठ एबी डिविलियर्स आहे. डिविलियर्सने 2015 साली वनडेमध्ये 58 षटकार मारले होते.

  • एका वर्षात वनडेत सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू

    • 64 षटकार - रोहित शर्मा (2023)

    • 58 षटकार - एबी डिविलियर्स (2015)

    • 56 षटकार - ख्रिस गेल (2019)

    • 48 षटकार - शाहिद आफ्रिदी (2002)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025 Semifinal: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास 'या' संघाला मिळणार फायनलचं तिकीट, नियम वाचा

Goa Crime: बालकांवरील अत्याचारप्रकरणी हेमंत दास दोषी, बालन्यायालयाचा निवाडा; 2 मुलांना बनवले होते वासनेची शिकार

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतीसाठी 'बॅलेट पेपर'चा वापर, पाच कोटींचा होणार खर्च; मतदारयादीत नवी नावे जोडणे स्थगित

Goa Politics: 'माझे घर'ला 'खो' घालण्याचा यत्न, विरोधी आमदारांना धडा शिकवा; CM प्रमोद सावंतांचे जनतेला आवाहन

Bihar Elections: "मंचावर येऊन नाचायला सांगा ते नाचतील..." विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

SCROLL FOR NEXT