Rohit Sharma 19 IPL Season As Capped Cricketer Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma Record: मुंबईच्या राजाचा 'विराट' पराक्रम! धोनी-कोहलीला जे जमलं नाही, ते 'हिटमॅन'ने करून दाखवलं

Rohit Sharma 19 IPL Season As Capped Cricketer: भारतीय क्रिकेटचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याने रविवारी २९ मार्च रोजी आयपीएलच्या मैदानात पाऊल ठेवताच इतिहासाच्या सुवर्ण पानावर आपले नाव कोरले आहे.

Sameer Amunekar

Rohit Sharma IPL Record : भारतीय क्रिकेटचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याने रविवारी २९ मार्च रोजी आयपीएलच्या मैदानात पाऊल ठेवताच इतिहासाच्या सुवर्ण पानावर आपले नाव कोरले आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामातील मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात मैदानात उतरताच रोहितने असा एक टप्पा गाठला आहे, जो आतापर्यंत महेंद्रसिंग धोनी किंवा विराट कोहली यांसारख्या दिग्गजांनाही गाठता आलेला नाही. रोहित शर्मा आता आयपीएलच्या सर्व १९ आवृत्त्यांमध्ये 'कॅप्ड प्लेयर' (आंतरराष्ट्रीय अनुभव असलेला खेळाडू) म्हणून खेळणारा जगातील पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.

विराट कोहली या शर्यतीत मागे का पडला?

चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की, विराट कोहली देखील पहिल्या हंगामापासून खेळत आहे, मग तो या विक्रमात मागे कसा? याचे उत्तर रोहितच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात दडलेले आहे. रोहित शर्माने आयपीएलचा पहिला हंगाम (२००८) सुरू होण्यापूर्वीच, म्हणजे जून २००७ मध्ये आयर्लंडविरुद्ध भारतासाठी पदार्पण केले होते.

याउलट, विराट कोहलीने २००८ च्या पहिल्या हंगामात पदार्पण केले तेव्हा तो एक 'अनकॅप्ड' (ज्याने आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही असा) खेळाडू होता. विराटने आयपीएलच्या पहिल्या हंगामानंतर श्रीलंकेविरुद्ध डॅम्बुला येथे भारतासाठी पहिला सामना खेळला होता. यामुळे रोहित या शर्यतीत अव्वल ठरला आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा लाडका 'थाला' म्हणजेच एम. एस. धोनी जेव्हा या हंगामातील आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा तो रोहितच्या या क्लबमध्ये सामील होणारा दुसरा खेळाडू ठरेल. मात्र, सध्या तरी हा बहुमान केवळ रोहितच्या नावावर जमा झाला आहे. रोहितने आयपीएलच्या १९ व्या हंगामातही आपली छाप कायम ठेवत मुंबई इंडियन्सच्या सलामीवीर म्हणून मैदानात हजेरी लावली.

डेक्कन चार्जर्स ते मुंबई इंडियन्स: एक सुवर्ण प्रवास

रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात डेक्कन चार्जर्स या संघाकडून झाली होती. पहिल्या तीन हंगामात त्याने ४५ सामन्यांत ११७० धावा कुटल्या आणि २००९ मध्ये संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे, याच काळात त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्ट्रिक घेण्याची किमयाही केली होती.

२०११ मध्ये रोहित मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आणि तिथून एका नव्या युगाची सुरुवात झाली. आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला ५ वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहितने आतापर्यंत या फ्रेंचायझीसाठी २२८ सामन्यांत ५८७६ हून अधिक धावा केल्या आहेत. त्याची ही सातत्यपूर्ण कामगिरी त्याला खऱ्या अर्थाने लीगचा 'महान' खेळाडू बनवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

SCROLL FOR NEXT