Rohit Sharma post | Yashasvi Jaiswal - Sarfaraz Khan Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma Post: "ही आजकालची मुलं...", कॅप्टन रोहितची टीम इंडियाच्या 'यंगिस्तान'साठी स्पेशल पोस्ट

India vs England, 3rd Test: राजकोट कसोटीत इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने युवा खेळाडूंसाठी एक स्पेशल पोस्ट केली आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma instagram post for Youngster:

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 434 धावांनी विजय मिळवला. भारताच्या कसोटी इतिहासातील हा धावांच्या फरकाने मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला.

राजकोटमधील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर मिळवलेल्या या विजयात युवा खेळाडूंचे मोठे योगदान राहिले. याबद्दल भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही त्यांचे कौतुक केले आहे.

या सामन्यात 22 वर्षीय यशस्वी जयस्वालने आक्रमक फलंदाजी करत दुसऱ्या डावात 12 षटकारांसह 214 धावांची नाबाद खेळी केली. तसेच 26 वर्षीय सर्फराजनेही याच सामन्यातून पदार्पण केले. त्याने पदार्पणाच्याच सामन्यात आक्रमक खेळताना पहिल्या डावात 62 आणि दुसऱ्या डावात नाबाद 68 धावांची खेळी केली.

सर्फराज आणि जयस्वाल यांच्यात दुसऱ्या डावात 158 चेंडूत नाबाद 172 धावांची भागीदारीही झाली.

याशिवाय याच सामन्यातून सर्फराजसह यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलनेही भारताकडून पदार्पण केले. त्याला पहिल्या डावात फलंदाजीची संधी मिळाली होती, यावेळी त्याने 46 धावांची खेळी केली. तसेच आर अश्विनबरोबर 8 व्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारीही केली.

इतकेच नाही तर त्याने या सामन्यात निर्भिडपणे शानदार यष्टीरक्षणही केले. त्याने दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने केलेल्या थ्रोवर पहिल्या डावातील शतकवीर बेन डकेटला चपळाईने धावबाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला होता. या धक्क्यातून नंतर इंग्लंड संघ सावरला नाही आणि ५५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अवघ्या दीड सत्रात 122 धावांवर सर्वबाद झाला.

दरम्यान, रोहितने सर्फराज आणि जयस्वाल भागीदारीदरम्यानचा आणि जुरेलने डकेटला धावबाद करतानाच्या क्षणाचे फोटो इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केले आहे.

तसेच त्याने या फोटोच्या कॅप्शनवर लिहिले की 'ही आजकालची मुलं...'. युवा खेळाडूंनी दाखवलेल्या धैर्याबद्दल कौतुक करताना लिहिलेल्या त्याच्या या कॅप्शनची मात्र सध्या चर्चा रंगली आहे. त्याच्या या पोस्टचा स्क्रिनशॉटही सध्या व्हायरल होत आहे.

Rohit Sharma post

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या सामन्यात रोहितने देखील पहिल्या डावात 131 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच अष्टपैलू रविंद्र जडेजाची कामगिरीही महत्त्वाची ठरली . त्याने पहिल्या डावात 112 धावांची शतकी खेळी केली.

तसेच दुसऱ्या डावात गोलंदाजीमध्ये 5 विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या डावातही दोन विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय दुसऱ्या डावात शुभमन गिलनेही 91 धावांची चांगली खेळी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT