IND vs ENG: 'मला जास्त बोलायचे नाही...', रोहितने जयस्वालचं का केलं नाही भरभरून कौतुक?

Rohit Sharma on Yashasvi Jaiswal: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग दोन सामन्यात द्विशतके करणाऱ्या जयस्वालचे फार कौतुक करण्यापासून रोहित शर्माने स्वत:ला रोखले होते.
Yashasvi Jaiswal - Rohit Sharma
Yashasvi Jaiswal - Rohit SharmaX/BCCI
Published on
Updated on

India captain Rohit Sharma refrain from praising Yashasvi Jaiswal after scoring second Test Double Century against England:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील राजकोटला झालेला तिसरा सामना भारताने तब्बल 434 धावांनी जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताच्या विजयात अनेक खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे ठरले. यात यशस्वी जयस्वाल हे नाव देखील प्रामुख्याने घेतले जात आहे.

जयस्वालने राजकोट कसोटीत नाबाद द्विशतकी खेळी केली आहे. त्याचे हे या मालिकेतील सलग दुसरे द्विशतक आहे. त्यामुळे त्याने अनेक विक्रमही केले आहेत. मात्र असे असले, तरी रोहितने त्याच्यावरील दबाव अधिक न वाढवण्यासाठी त्याच्याबद्दल फार बोलणार नसल्याचे सामन्यानंतर सांगितले.

रोहित सामन्यानंतर म्हणाला, 'मी त्याच्याबद्दल खूप बोललो आहे. मला खात्री आहे चेंजिंगरुमच्या बाहेरही त्याच्याबद्दल मोठ्याप्रमाणात चर्चा आहे. पण मला त्याच्याबाबत शांत राहायचे आहे, खूप बोलायचे नाही. त्याने त्याच्या कारकिर्दीच शानदार सुरुवात केली आहे. मला वाटते त्याने यापुढेही चांगलेच खेळत राहावे. तो चांगला खेळाडू वाटत आहे.'

Yashasvi Jaiswal - Rohit Sharma
IND vs ENG: स्टोक्सच्या 100 व्या कसोटीत भारताचा सर्वात मोठा विजय; इंग्लंडला 434 धावांनी पराभूत करत मालिकेतही आघाडी

जयस्वालने राजकोटमध्ये भारताकडून दुसऱ्या डावात 236 चेंडूत नाबाद 214 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 12 षटकार मारले. याबरोबरच त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्या तीन सामन्यातच 500 धावांचा टप्पा पार केला आहे.

दरम्यान राजकोट कसोटीत जयस्वालव्यतिरिक्त रोहितसह रविंद्र जडेजा आणि सर्फराज खान यांचीही कामगिरी चांगली राहिली. रोहित आणि जडेजाने पहिल्या डावात अनुक्रमे 131 आणि 112 धावांची शतकी खेळी केली होती.

तसेच जडेजाने भारताकडून दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना 5 विकेट्सही घेतल्या. त्याला या कामगिरीमुळे सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.

सर्फराजनेही या सामन्यातून कसोटी पदार्पण करताना दोन्ही डावात 62 धावा आणि नाबाद 68 धावा अशा अर्धशतकी खेळी केल्या. याबद्दलही रोहितने कौतुक केले.

Yashasvi Jaiswal - Rohit Sharma
IND vs ENG: इंग्लंडच्या बझबॉलवर जयस्वाल भारी! 12 षटकार अन् 14 चौकारांसह डबल सेंच्युरी करत रचला विक्रमांचा डोंगर

रोहित म्हणाला, 'या सामन्यासाठी आम्ही विचार केला की जडेजाकडे खूप अनुभव आहे. त्याने खूप धावाही केल्या. आम्हाला हे उजव्या आणि डाव्या हाताचे संमिश्रण हवेच होते. आम्हाला सर्फराज काय क्षमता घेऊन येतो हे माहित आहे आणि आम्हाला त्याला फलंदाजीआधी थोडा वेळ द्यायचा होता. आपण पाहिले की तो फलंदाजीत काय करू शकतो.'

त्याचबरोबर रोहितने असेही म्हटले की 'सध्या आमच्याकडे फलंदाजीफळीबद्दल दिर्घकाळासाठी योजना नाही. आम्ही सध्या प्रवाहानुसार जात आहे आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीच्या मिश्रणावरही हे अवलंबून आहे.'

रोहितने नाणेफेक जिंकणेही महत्त्वाचे ठरल्याचे म्हटले. तसेच त्याने गोलंदाजांचेही कौतुक केले. गोलंदाजांनीही या सामन्यात मोलाचा वाटा उचलल्याचे त्याने म्हटले.

आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून रांचीमध्ये चालू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com