Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

टी-20 मालिकेचा भाग होण्यासाठी 'हिट मॅन' ला द्यावी लागणार अग्नि परीक्षा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 7 जुलैपासून सुरु होत आहे.

दैनिक गोमन्तक

India Vs England T20 Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 7 जुलैपासून सुरु होत आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी रोहित शर्माची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. मात्र रोहित शर्मा अद्याप टी-20 मालिकेत खेळू शकलेला नाही. रोहितचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी टी-20 मालिकेचा भाग होण्यासाठी त्याला वैद्यकिय चाचणीचा सामना करावा लागणार आहे. (Rohit Sharma Have To Pass Important Test To Become Part Of T20 Series Against England)

दरम्यान, लीसेस्टरशायरविरुद्धच्या चार दिवसांच्या सराव सामन्यादरम्यान रोहित शर्माची (Rohit Sharma) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे एजबॅस्टनमधील इंग्लंडविरुद्धच्या (England) पाचव्या कसोटीला मुकला होता. बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "होय, रोहित शर्मा निगेटिव्ह आला असून आता तो क्वारंटाइनच्या बाहेर आहे."

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “मेडिकल प्रोटोकॉलनुसार रोहित शर्मा आयसोलेशनमधून बाहेर आला आहे. मात्र तो सराव सामन्यांचा भाग होऊ शकलेला नाही. रोहितला सावरण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे.''

रोहित शर्माने नेट प्रॅक्टिस सुरु केली

दुसरीकडे, रोहित शर्माने रविवारी नेट प्रॅक्टिसला सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माने नेटमध्ये जवळपास 30 मिनिटे सराव केला. सोमवारी संध्याकाळी रोहित शर्माला फिटनेस चाचणी द्यावी लागणार आहे. रोहित शर्मा पहिल्या टी-20 साठी उपलब्ध होणार की नाही हे फिटनेस चाचणीनंतरच स्पष्ट होईल.

मात्र, रोहित शर्माची टी-20 मालिकेत खेळण्याची शक्यता खूप जास्त आहे. या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

USA Tariff: रशियाशी जवळीक पडली महागात? अमेरिकेने भारतावर लावला 25 टक्के टॅरिफ, शेअर बाजारात भूकंपाची शक्यता!

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला कधीपर्यंत राखी बांधता येईल? भद्रकाळ टाळा, नेमका शुभमुहूर्त जाणून घ्या

Goa Assembly Live: नोकऱ्या नसल्याने तरुणाई व्यसनांच्या विळख्यात; युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप!

Japan Tsunami Photos: जपानमध्ये त्सुनामीचा हाहाकार! 20 लाख लोकांना घर सोडण्याचे निर्देश; धडकी भरवतात फोटो

गोव्यात बेकायदा बांधकामांना बसणार चाप; मंत्री माविन गुदिन्हो यांची कायदा करण्याची घोषणा

SCROLL FOR NEXT