(India Vs England) इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) सामना झाल्यानंतर गेला महिनाभर भारतीय संघ इंग्लंडमध्ये (England) कसोटी मालिका खेळण्यासाठी (Test Cricket Series) थांबला आहे. मालिका अद्याप सुरू देखील झाली नाही, आणि भारताचे खेळाडू दुखापतग्रस्त (Batsman Injured) होण्याची समस्या थांबण्याचे नाव घेत नाहिये. भारताला इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे(5 Test Matches Series). त्यासाठी भारतीय संघ नेटमध्ये कसून सराव (Net Practice) करत आहे. पण भारतासाठी एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. भारतीय संघ नेटमध्ये सराव करतेवेळी मोहम्मद शमी (Mohammed Shami) चा बाउन्सर मयंक अग्रवालच्या (Mayank Agrwal Injured) डोक्याला लागल्याने तो जखमी झाला आहे, त्यामुळे मयंक अग्रवाल इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी मुकणार आहे. शुभमन गिल (Shubhman Gill) हा तर दुखापतीमुळे त्या अगोदरच मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत कोणाला जोडीदार (Opener Batsman) म्हणून पाठवावे हा मोठं प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्याचा विचार करता रोहित शर्मा हा भारतीय संघासाठी कसोटीचा नियमित सलामीचा फलंदाज म्हणून मागच्या अनेक मालिकांमध्ये खेळत आहे त्याअगोदर मयंक अग्रवाल ही जबाबदारी पार पाडत होता. आज दोन ऑगस्टला बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त झाल्याने तो पहिल्या सामन्यातून बाहेर झाला आहे.
रोहित सोबत कोण असेल ओपनर राहुल की ईश्वरन...
भारतीय संघामध्ये रोहित सोबत सलामीसाठी अजून दोन विकल्प आहेत, ज्यामध्ये बंगालचा रणजीपटू अभिमन्यू ईश्वरन आहे. तर के एल राहुल हा यापूर्वीही भारतासाठी सलामीचा फलंदाज म्हणून त्याने जबाबदारी पार पडली आहे. तसेच त्याने इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळून शतक सुद्धा बनवलेले आहे. त्यामुळे आता पहावे लागणार की रोहित शर्मा सोबत ओपनिंग साठी कोणाला संधी मिळते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.