IND vs SL Dainik Gomantak
क्रीडा

विराटला T20I मधून विश्रांती; रोहितला कसोटीपूर्वीच केले कर्णधार

IND vs SL: रोहित शर्माची श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेपूर्वी कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) दोन सामन्यांच्या मालिकेपूर्वी कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच जसप्रीत बुमराहची (Jaspreet Bumrah) उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून मोहालीत सुरू होणार आहे, तर दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये (Bangalore) दिवस-रात्र खेळला जाणार आहे.

विराट कोहलीला (Virat Kohli) T20I मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे, पण तो कसोटी सामन्यांसाठी परतणार आहे, तसेच ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि शार्दुल ठाकूरसह (Shardul Thakur) श्रीलंकेच्या संपूर्ण भारत दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे.

अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) म्हणाले की, रोहितच्या नियुक्तीवर 'कोणतीही चर्चा झाली नाही' आणि त्याने केलेली 'स्पष्ट निवड' होती.

या दरम्यान, अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी कसोटी संघातून वगळण्यात आले आहे, परंतु चेतन शर्माने स्पष्ट केले की या दोघांसाठी "दारे अद्याप उघडेच आहेत".

वॉशिंग्टन सुंदर आणि केएल राहुल देखील श्रीलंकेविरुद्धच्या संपूर्ण घरच्या मालिकेतुन बाहेर असणार आहेत जोपर्यंत ते लवकर बरे होत नाहीत.

चेतन शर्माने असेही सांगितले की, रविचंद्रन अश्विन कसोटी संघाचा भाग असला तरी, मालिकेतील त्याचा सहभाग फिटनेस क्लिअरन्सच्या अधीन असणार आहे.

मोहाली कसोटीपूर्वी अश्विनच्या फिटनेसचे संघ व्यवस्थापनाकडून तपासणी केली जाईल, असे भारतीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणाले आहेत.

एसएल मालिकेसाठी भारताचा कसोटी संघ:

रोहित शर्मा (C), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, आर जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (वीसी).

T20I संघ:

रोहित शर्मा (C), रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद यादव , भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (वीसी), आवेश खान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT