टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा T20 सामना जिंकला, पण त्यांच्या खराब फील्डिंगने चाहत्यांची नक्कीच निराशा केली. भारताच्या वाट्याला सहज येऊ शकणारा सामना जिंकण्यासाठी त्याला शेवटच्या ओव्हरपर्यंत मेहनत घ्यावी लागली. टीमच्या खराब फिल्डींग मुळे कर्णधार रोहित शर्माही खूप निराश झाला आहे आणि रागाच्या भरात रोहितने तो चेंडू जमिनीवर लाथ मारताला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (Rohit got angry after Bhuvneshwar Kumar missed the catch)
भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्याशिवाय माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांचाही झेल सुटला. टीम इंडियाच्या (Team India) जीवनदानामुळे निकोलस पूरन (Nicholas Puran) आणि पॉवेल (Rovman Powell) यांना चांगली भागीदारी करण्याची संधी मिळाली आहे. टीम इंडियाच्या हातातून सामना निसटताना पाहून रोहितला खूप राग आला आणि या नाराजीत त्याने चेंडूला किक मारली.
ही घटना वेस्ट इंडिजच्या (West Indies) डावाच्या 16व्या ओव्हरमध्ये घडली. रोहितने भुवनेश्वरकडे चेंडू सोपवला. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर रोव्हमन पॉवेल वेस्ट इंडिजसाठी स्ट्राइकवर होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर पॉवेलने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू हवेत खूप उंच गेला. भुवनेश्वर बरोबर चेंडूखालीच होता. चेंडू त्याच्या बोटातुन घसरला, हे पाहून रोहित चांगलाच संतापला. बॉल समोर येताच त्याने लाथ मारली.
यावेळी तो भुवनेश्वरला काहीतरी बोलताना दिसला. भुवनेश्वरच्या क्षेत्ररक्षणामुळे रोहित निराश झाला असेल पण त्याने सामन्यानंतर भुवनेश्वरच्या गोलंदाजीचे कौतुकही केले. तो म्हणाला, 'ते अद्भुत होते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आम्हाला माहित होते की हे सोपे होणार नाहीये. दबावाखाली त्याने स्वत:ला सिद्ध करुन दाखवले याचा मला खूप आनंद आहे. भुवनेश्वर जेव्हा गोलंदाजी करत होता तोच सामन्याचा टर्निंग पॉइंट होता आणि इथेच अनुभव उपयोगी पडतो. तो अनेक वर्षांपासून हे करत आहे आणि आमचा त्याच्यावरती विश्वास आहे.
शुक्रवारी येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 8 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 186 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 3 बाद 178 धावा केल्या. या दोन्ही संघांमधील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.