Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: अरर! 35 की 36..., हिटमॅन चक्क स्वत:चं वयच विसरला अन्...

रोहित शर्मा विसरभोळा आहे, हे सर्वांनाच जवळपास माहित आहे, पण तो आयपीएल मॅच प्रेझेंटेशनवेळी त्याचे वयच विसरला होता.

Pranali Kodre

Rohit Sharma Forgets His Own Age: रोहित शर्मा हा विसरभोळा आहे, हे आता जवळपास सर्वांना माहित आहे. विराट कोहलीसह अनेक क्रिकेटपटूंनी याबद्दल यापूर्वी खुलासाही केला आहे. याचा प्रत्यय रविवारी (३० एप्रिल) चाहत्यांनाही आला आहे.

खरंतर रविवारी रोहितला ३६ वा वाढदिवस देखील होता. तसेच त्याचदिवशी आयपीएल इतिहासातील १००० वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात वानखेडे स्टेडियमवर पार पडला. विशेष म्हणजे कर्णधार म्हणून रोहितचा हा १५० वा सामनाही होता.

महत्त्वाचे म्हणजे मुंबई इंडियन्सने हा सामना ६ विकेट्सने जिंकला. या सामन्यानंतर जेव्हा समालोचक हर्षा भोगले यांनी प्रेसेंटेशनसाठी त्याचे स्वागत केले, त्यावेळी रोहित त्याचे वयच विसरला होता. पण नंतर तो मस्करी करत असल्याचे त्याने सांगितले.

झाले असे की सामन्यानंतर हर्षा भोगले यांनी प्रेझेंटेशनवेळी रोहितशी बोलायला सुरुवात करताना त्याला म्हटले की 'तुझ्या ३६ व्या वाढदिवशी विजय मिळाला आहे.' त्यावर रोहित म्हणाला, 'नाही ३५ व्या, ३६ व्या नाही.' त्यांनंतर हर्षा म्हणाले, 'ओह! त्यांनी मला एक आकडा जास्त सांगितला.' त्यानंतर रोहित म्हणाला, 'नाही, नाही, ३६ वाच वाढदिवस आहे. मी मजा करत होतो.'

दरम्यान रोहितचे हे हर्षा भोगलेंबरोबरचे संभाषण चांगलेच व्हायरलही झाले. तसेच चाहत्यांनी या मजेशीर संवादाची मजाही घेतली.

मुंबईचा राजस्थानविरुद्ध विजय

आयपीएल २०२३ मध्यये रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 212 धावा केल्या होत्या. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने 124 धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 19.3 षटकात 4 विकेट्स गमावत 214 धावा करून पूर्ण केला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 55 धावांची खेळी केली. तसेच कॅमेरॉन ग्रीनने 44 धावा केल्या.

या सामन्यात अखेरच्या षटकात मुंबईला 17 धावांची गरज होती. यावेळी टीम डेव्हिडने जेसन होल्डरने गोलंदाजी केलेल्या या षटकाच्या पहिल्या तिन्ही चेंडूंवर तीन षटकार ठोकले आणि मुंबईला विजय मिळवून दिला. डेव्हिड 45 धावांवर नाबाद राहिला.

महत्त्वाचे म्हणजे आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर हा सर्वोच्च धावांचा पाठलाग ठरला. यापूर्वी कधीही 213 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग वानखेडे स्टेडियमवर झाला नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'नवा फॉर्म्युला'! RGPने उघडले युतीचे दरवाजे; गोव्याच्या राजकारणात मोठा बदल?

Codar: 'पूर्वी खांडोळा गावात मोठी वनराई होती, ती कापून त्यावर शहर बनवले'; कोडार आणि आयआयटीचा गोंधळ

अग्रलेख: धारगळ की वन म्हावळिंगे? भिजत घोंगडे; वेर्ण्यात उभारलेले सुसज्ज क्रिकेट मैदान

Rajmata Jijabai Karandak: अखेरच्या 10 मिनिटांत 2 गोल! गोव्याच्या महिलांना पराभवाचा धक्का; 'देविका' छत्तीसगडच्या विजयाची शिल्पकार

Goa Ranji Cricket: गोव्याच्या मोहिमेला यंदा घरच्या मैदानावर आरंभ! चंदीगडसोबत रंगणार सामना; 15 ऑक्टोबरपासून थरार

SCROLL FOR NEXT