Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

रोहित शर्माने केले रवींद्र जडेजाचे कौतुक; फलंदाजी-बॉलिंग नाही तर...

IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील मोहाली कसोटीत रवींद्र जडेजा 175 धावांवरती असतानाही डाव घोषित करण्याच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

दैनिक गोमन्तक

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील मोहाली कसोटीत रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 175 धावांवरती असतानाही डाव घोषित करण्याच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) निशाण्यावर आले आहेत. पण 6 मार्चला सामना संपल्यानंतर रोहितने सांगितले की, हा निर्णय स्वतः रवींद्र जडेजाने घेतला. मोहाली कसोटीत रवींद्र जडेजाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने सामन्यात नाबाद 175 धावांसह एकूण नऊ विकेट्स घेतल्या, ज्यामुळे संघाला तीन दिवसात श्रीलंकेवर एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवता आला आहे. पहिल्या डावात 174 धावांवरती बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात 178 धावांवरती बाद झाला आहे. (Rohit Sharma compliments Ravindra Jadeja)

डाव घोषित करण्याच्या निर्णयावरती रोहित शर्माने सामन्यानंतरच्या सादरीकरणात सांगितले आहे की, रवींद्र जडेजानेच डाव घोषित करण्याबाबत सांगितले होते. ते किती निस्वार्थी खेळाडू आहेत हे यावरून दिसून येत आहे. दिवसाच्या खेळा नंतर जडेजाने सांगितले की, डाव घोषित करण्यासाठी ड्रेसिंग रुम मध्ये मेसेज पाठवला होता.

मोहाली जिंकल्यावर रोहित शर्मा काय म्हणाला?

कसोटी कर्णधारपदाची सुरुवात विजयाने केल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. "ही चांगली सुरुवात होती," असंही तो म्हणाला. तर आमच्यासाठी हा एक उत्तम क्रिकेट सामना होता. आम्ही सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. खरे सांगायचे तर, हा सामना तीन दिवसांत संपेल असे मला अजिबात वाटले नव्हते. फलंदाजीसाठी ती चांगली खेळपट्टी होती, त्यात काही वळण होते आणि वेगवान गोलंदाजांमुळेही थोडी मदत मिळत होती. खेळाडूंचे श्रेय खूप आहे, त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि दबाव निर्माण केला आणि श्रीलंकेच्या फलंदाजांसाठी गोष्टी सोप्या होऊ दिल्या नाहीत आणि नियमित अंतराने विकेट्स घेतल्या आहेत.

मोहाली कसोटीत विक्रमी जत्रेचे आयोजन,

तो म्हणाला, 'भारतीय क्रिकेटसाठी ही चांगले लक्षणे आहेत. विराट कोहलीसाठी (Virat Kohli) खूप चांगली कामगिरी झाली आहे, एक कर्तृत्वाची कसोटी आहे तर आम्हाला इथे येऊन ही कसोटी जिंकायची होती. इतकी मोठी वैयक्तिक कामगिरी पाहणे खूप छान वाटते आहे. जडेजाने वैयक्तिक यश संपादन करताना, रविचंद्रन अश्विनने कपिल देव (131 सामन्यांत 434 विकेट्स) यांना मागे टाकले आणि आता 436 विकेट्ससह भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. तर अश्विन अशा प्रकारे अनिल कुंबळेच्या 619 बळींच्या विक्रमाच्या मागे आहे.

त्याचबरोबर कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्या सामन्यात संघाला डावाने विजय मिळवून देणारा रोहित दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे. पॉली उमरीगर हा पहिला भारतीय कर्णधार होता ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने 1955-56 मध्ये मुंबईत न्यूझीलंडचा एक डाव तसेच 27 धावांनी पराभव केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT