Rohit Sharma ODI Dainik Gomantak
क्रीडा

India vs Sri Lanka: नव्या वर्षात हिटमॅनचा जुना अंदाज! अर्धशतकासह मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडेत अर्धशतक केले आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma: भारत विरुद्ध श्रीलंका संघात गुवाहाटी येथे होत असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. या खेळीबरोबरच त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

रोहितने या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला होता. त्याने 41 चेंडूत त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील त्याचे 47 वे अर्धशतक ठरले. त्यामुळे अनेक चाहत्यांनी रोहितचा जुना अंदाज पुन्हा पाहायला मिळाल्याची भावना व्यक्त केली.

(Rohit Sharma completes 9500 runs in ODI Cricket)

गेल्या वर्षात रोहित फार चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. त्याला मोठी खेळीही करता आली नव्हती. पण नव्या वर्षात रोहितने अर्धशतकासह चांगली सुरुवात केली आहे.

मात्र, रोहितला या अर्धशतकाचे रुपांतर शतकामध्ये करण्यात अपयश आहे. तो 67 चेंडूत 83 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. पण या खेळीदरम्यान त्याने वनडेत 9500 धावांचा टप्पा पार केला आहे.

वनडेमध्ये 9500 धावा करणारा तो भारताचा सहावा खेळाडू ठरला. त्याच्या नावावर आता 236 वनडे सामन्यांत 48.90 च्या सरासरीने 9537 धावांची नोंद आहे. यात त्याच्या 29 शतके आणि 47 अर्धशतकांचा समावेश आहे.

यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर (18426), विराट कोहली (12510*), सौरव गांगुली (11363), राहुल द्रविड (10889) आणि एमएस धोनी (10773) यांनी 9500 वनडे धावांचा टप्पा पार केला आहे.

या सामन्यात रोहितने शुभमन गिलबरोबर शतकी भागीदारी केली. त्याच्यात आणि शुभमन सलामीला 143 धावांची भागीदारी झाली. गिलनेही अर्धशतकी खेळी केली. गिल 60 चेंडूत 70 धावा करून बाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT