Hardik Pandya and Dasun Shanaka
Hardik Pandya and Dasun ShanakaDainik Gomantak

India vs Sri Lanka: वनडे क्रिकेटमध्ये कोणचं वर्चस्व, जाणून घ्या खास आकडेवारी

भारत आणि श्रीलंका यांची एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी राहिली आहे, जाणून घ्या.
Published on

India vs Sri Lanka, ODI Series: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 10 जानेवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. यावर्षी भारतात वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, या मालिकेतून कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज यांसारखे खेळाडू भारतीय संघात पुनरागमन करणार आहेत. या खेळाडूंना वनडे मालिकेपूर्वी झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेदरम्यान विश्रांती दिली होती.

या मालिकेतील पहिला सामना 10 जानेवारी रोजी गुवाहाटी येथे होणार आहे. त्यानंतर 12 जानेवारीला कोलकाता येथे दुसरा वनडे सामना आणि 15 जानेवारीला तिरुअनंतपुरम येथे तिसरा वनडे सामना होणार आहे. हे तिन्ही सामने भारती प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता चालू होतील.

Hardik Pandya and Dasun Shanaka
India vs Sri Lanka: रोहितच्या नेतृत्वाखाली 'या' खेळाडूला मिळणार संधी, टी-20 मालिकेत...!

आमने-सामने कामगिरी

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आत्तापर्यंत 162 वनडे सामने खेळले असून भारताने 93 सामने जिंकले आहेत. तसेच 57 सामने पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर 11 सामन्यांचा निकाल लागलेला नाही, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.

तसेच या दोन्ही संघात भारतामध्ये 51 वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 36 सामने भारताने जिंकले होते, तर 12 सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. तसेच 3 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

भारत आणि श्रीलंका यांच्यात भारतात अखेरचा वनडे सामना 17 डिसेंबर 2017 रोजी खेळला होता. हा सामना भारताने जिंकला होता. दरम्यान श्रीलंकेने भारतात शेवटच्यावेळेस 10 डिसेंबर 2017 रोजी धरमशाला येथे विजय मिळवला होता.

Hardik Pandya and Dasun Shanaka
India vs Sri Lanka: भारतीय चाहत्यांसाठी मोठी बातमी, अखेर 'हे' 3 धाकड मारणार मैदान

भारत-श्रीलंका वनडेत सर्वाधिका विकेट्स-धावा करणारे खेळाडू

भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरने केल्या आहेत. त्याने 3113 धावा केल्या आहेत. तसेच सध्या सक्रिय खेळाडूंमध्ये विराट कोहलीने सर्वाधिक 2220 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माने 1665 धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर आहेत. त्यांनी भारताविरुद्ध 74 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच सक्रिय खेळाडूंमध्ये आर अश्विनने सर्वाधिक 32 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या मागोमाग रविंद्र जडेजा असून त्याने 25 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com