Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma ने रचला इतिहास, T20 मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज

India vs Hong Kong: भारतीय कर्णधार रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे.

दैनिक गोमन्तक

India vs Hong Kong: भारतीय कर्णधार रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3500 धावा करण्याची कामगिरी रोहितने केली आहे. हाँगकाँगविरुद्ध आशिया चषक 2022 च्या चौथ्या सामन्यात बुधवारी त्याने ही कामगिरी केली. आपल्या इनिंगमध्ये धाव घेताच T20 आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटमध्ये 3500 धावा करणारा रोहित जगातील पहिला फलंदाज ठरला. रोहीतने 32.11 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. त्याच्याआधी महिला क्रिकेटमध्ये ही कामगिरी न्यूझीलंडच्या सुझी बेट्सने केली आहे.

दरम्यान, रोहितने हाँगकाँगविरुद्ध (Hong Kong) 21 धावांची खेळी खेळली. त्याने 13 चेंडूत दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. मात्र आयुष शुक्लाने भारतीय कर्णधाराला ऐजाज खानद्वारे झेलबाद केले.

तसेच, रोहितने आपल्या डावात 12 ऐवजी 13 धावा केल्या असत्या तर पाकिस्तानविरुद्ध त्याने ही कामगिरी केली असती. परंतु पाकिस्तानविरुद्ध एका रन्सने हा पराक्रम करण्यापासून तो हुकला. आशिया चषक 2022 चा दुसरा सामना रविवारी दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात खेळला गेला. या मॅचमध्ये टीम इंडियाचा (Team India) कर्णधार स्ट्रगल करताना दिसून आला.

दुसरीकडे, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितनंतर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 3497 धावा आहेत. गुप्टिलने 31.79 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली 3343 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

Volkswagen Layoffs: मेड इन चायनाचा दणका! फॉक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार नारळ; ऑटोमोबाईल जगतात इतिहासातील सर्वात मोठी कपात

Post Office Recruitment 2026: 10वी पास तरुणांसाठी खूशखबर! पोस्ट ऑफिसमध्ये 130 पदांवर भरती; अर्ज कुठे करावा? अर्जाची अंतिम तारीख काय? जाणून घ्या सर्व

SCROLL FOR NEXT