West Indies Vs India 5th T20: भारतीय फिरकी गोलंदाजांनी T20 मध्ये रचला इतिहास

West Indies Vs India: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने 88 धावांनी शानदार विजय नोंदवला.
Akshar Patel
Akshar PatelDainik Gomantak
Published on
Updated on

West Indies Vs India 5th T20: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने 88 धावांनी शानदार विजय नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या होत्या, त्यानंतर वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 15.4 षटकात केवळ 100 धावाच करु शकला.

दरम्यान, भारताच्या गोलंदाजांनी आश्चर्यकारक कामगिरी करत वेस्ट इंडिजचा (West Indies) डाव 16 षटकांतच गुंडाळला. या सामन्यात भारताच्या फिरकीपटूंची चुरस पाहायला मिळाली. या सामन्यात असा विक्रम झाला आहे, जो आता मोडणे कठीण आहे.

Akshar Patel
India Tour of West Indies: वनडे अन् टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये दाखल

वास्तविक, वेस्ट इंडिजचे सर्व फलंदाज भारताच्या फिरकी गोलंदाजांनी बाद केले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाचे सर्व 10 फलंदाज फिरकी गोलंदाजांनी बाद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यापूर्वी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात असे घडले नव्हते. सामन्यात अक्षर पटेलने (Axar Patel) 3 षटकात 15 धावा देत 3 बळी घेतले, तर कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) 3 आणि रवी बिश्वोई 4 बळी घेतले. म्हणजेच तिन्ही फिरकीपटूंनी मिळून वेस्ट इंडिजच्या 10 विकेट्स घेण्यात यश मिळवले.

दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास तर भारताने 20 षटकात 7 विकेट गमावत 188 धावा केल्या, ज्यामध्ये श्रेयस अय्यरने 40 चेंडूत 64 धावा केल्या, तर दीपक हुडाने 25 चेंडूत 38 धावा केल्या. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पाचव्या T20 मध्ये भारताचे नेतृत्व केले. हार्दिकने 16 चेंडूत 28 धावा केल्या. भारतीय संघाने 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका 4-1 अशी जिंकण्यात यश मिळवले.

Akshar Patel
India vs England:...पण अश्विनचा हा अप्रतिम झेल पाहा VIDEO

शिवाय, अक्षल पटेलला सामनावीर, तर अर्शदीप सिंगला मालिकावीराचा किताब देण्यात आला. या मालिकेत अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्यामुळेच त्याच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. आशिया कपच्या संघात अर्शदीपचाही समावेश होण्याची शक्यता आहे. आता भारतीय संघ 28 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com