Asia Cup 2022: आशिया कपला 27 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी पूर्णपणे सज्ज दिसत आहे. भारतीय संघ 20 ऑगस्टला आशिया कपसाठी रवाना होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. त्याचबरोबर या सामन्याच्या तिकिटांची मागणीही वाढत आहे. विशेष म्हणजे, तिकीटांच्या वाढत्या मागणीमुळे वेबसाइट क्रॅश झाली आहे. यावरुन तुम्ही तिकीटांच्या मागणीचा अंदाज लावू शकता.
तिकीट विक्री वाढत आहे
प्लॅटिनमलिस्ट, युएई (UAE) मधील सामन्याची तिकिटे बुक करण्यासाठी सर्वात लोकप्रिय वेबसाइट्सपैकी एक आहे. बंपर ओपनिंग देखील मिळाली आहे. त्याचवेळी 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत वेबसाइटच्या ट्रॅफिकमध्ये 70 हजारांची बंपर वाढ झाली. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे तिकीट देण्यास उशीर झाल्याने चाहते आधीच नाराज होते. भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या दोन्ही संघांना चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळतो. मात्र, वेबसाइट क्रॅश झाल्यानंतर अडीच वाजेपर्यंत तिकीट उपलब्ध होणार नसल्याचे सांगण्यात आले.
28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान सामना होणार
विशेष म्हणजे, आशिया कप 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्ट रोजी सामना होणार आहे. वास्तविक, ग्रुप स्टेजनंतर भारत आणि पाकिस्तान सुपर-4 मध्येही आमनेसामने येऊ शकतात. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ग्रुप मॅच स्टेजचा सामना खेळवला जाईल. त्याचबरोबर आशिया चषक 2022 चा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.