Rohit Sharma Shardul Thakur Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: शार्दुल ठाकूरमुळे कॅप्टन रोहितचा चढला पारा, लाईव्ह सामन्यात वापरले अपशब्द

India vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत रोहित शर्मा शार्दुल ठाकूरवर चिडताना दिसला होता.

Pranali Kodre

Rohit Sharma Angry on Shardul Thakur: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात गुरुवारी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसमधील ब्रिजटाउन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर पार पडला. या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला.

दरम्यान या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा क्षेत्ररक्षणावेळी शार्दुल ठाकूरवर संतापलेला दिसला.

झाले असे की या सामन्यात पहिल्या डावात वेस्ट इंडिज संघ फलंदाजी करत होता. त्यावेळी भारताकडून कुलदीप यादव गोलंदाजी करत असलेल्या 19 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शार्दुल ठाकूर धिम्यागतीने क्षेत्ररक्षण करताना दिसला. त्याचमुळे रोहितने त्याच्यावर राग व्यक्त केला.

झाले असे की त्यावेळी वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप 34 चेंडूत 31 धावांवर फलंदाजी करत होता. त्याने मारलेल्या ड्राईव्हवर चेंडूचा पाठलाग शार्दुल करत होता. पण चेंडूची गती अधिक नसतानाही वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी 2 ऐवजी 3 धावा पळून काढल्या. त्याचमुळे रोहितने शार्दुलवर चिडताना काही अपशब्दांचाही वापर केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, असे असले तरी या सामन्याचा विचार करता भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली. शार्दुलने ३ षटके गोलंदाजी करताना 14 धावा देत 1 विकेट घेतली. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

तसेच रविंद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय मुकेश कुमार आणि हार्दिक पंड्या यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला 23 षटकात 114 धावांवर सर्वबाद केले.

त्यानंतर 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने सलामीला फलंदाजी करताना सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी क्रमवारीत अनेक बदल केले होते.

भारताकडून इशाननंतर सूर्यकुमार यादवने 19 धावा केल्या. तसेच रविंद्र जडेजा 16 धावांवर आणि रोहित शर्मा 12 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे भारताने 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग 22.5 षटकात 118 धावा करत सहज पूर्ण केला.

वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच जेडेन सील्स आणि यानिक कॅरिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT