Rohit Sharma X/ICC
क्रीडा

Rohit Sharma: हिटमॅनचा विश्वविक्रम! T20I मध्ये 'असा' पराक्रम करणारा बनला पहिलाच क्रिकेटर

India vs Afghanistan, T20I: अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात मिळवलेला विजय भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी खास ठरला आहे.

Pranali Kodre

India vs Afghanistan, 1st T20I at Mohali, Rohit Sharma Record:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सध्या टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीला पार पडला, ज्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. यासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, हा विजय रोहितसाठीही खास ठरला आहे. कारण पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 विजयी सामन्यांचा भाग होणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. म्हणजेच रोहितने एक खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 विजय मिळवले आहेत. रोहितने 149 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

या विक्रमाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानाचा अष्टपैलू शोएब मलिक आहे. त्याने 124 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 86 विजय मिळवले आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे पुरुष क्रिकेटपटू

  • 100 विजय - रोहित शर्मा (149 सामने)

  • 86 विजय - शोएब मलिक (124 सामने)

  • 73 विजय - विराट कोहली (115 सामने)

  • 70 विजय - मोहम्मद हाफिज (119 सामने)

  • 70 विजय - मोहम्मद नबी (113 सामने)

  • 68 विजय - मार्टिन गप्टील (122 सामने)

कर्णधार म्हणूनही विक्रम

गुरुवारी मिळवलेला विजय हा रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून मिळवलेला 40 वा विजय होता. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय 20 क्रिकेटमध्ये 40 किंवा त्यापेक्षा अधिक विजय मिळवणारा सातवा कर्णधार ठरला आहे. तसेच भारताचा एमएस धोनीनंतर दुसराच कर्णधार आहे. धोनीने 41 विजय मिळवले आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार

  • 42 विजय - असघर अफगाण (52 सामने)

  • 42 विजय - बाबर आझम (71 सामने)

  • 42 विजय - ब्रायन मसाबा (54 सामने)

  • 42 विजय - ओएन मॉर्गन (72 सामने)

  • 41 विजय - एमएस धोनी (72 सामने)

  • 40 विजय - ऍरॉन फिंच (76 सामने)

  • 40 विजय - रोहित शर्मा (52 सामने)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Youth Protes: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

SCROLL FOR NEXT