Rohit Sharma: T20I मध्ये पुनरागमनाबरोबरच हिटमॅनच्या निशाण्यावर 3 मोठे विक्रम, विराटलाही टाकू शकतो मागे

Rohit Sharma Record: आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान रोहित शर्मा तीन मोठ्या विक्रमांना गवसणी घालू शकतो.
Rohit Sharma
Rohit SharmaBCCI

India vs Afghanistan, T20I Series, Rohit Sharma Record:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात 11 जानेवारीपासून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित आणि विराट हे दोघेही 14 महिन्यांनी भारताकडून टी20 क्रिकेट खेळताना दिसणार आहेत.

दरम्यान, या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्माला खास विक्रम करण्याची संधी आहे. त्याने या मालिकेत जर 147 धावा केल्या, तर तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा पूर्ण करू शकतो. जर त्याने असे केले, तर तो विराट कोहलीनंतर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4000 धावा करणारा दुसराच खेळाडू ठरेल.

Rohit Sharma
Rohit Sharma: रोहितला रबाडा झेपेना! कर्णधाराला आवडत्या पुल शॉटवरच आऊट करून बनला सर्वात यशस्वी बॉलर

सध्या विराटने 115 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 52.73 च्या सरासरीने 4008 धावा केल्या आहेत. तसेच रोहितने 148 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 4 शतके आणि 29 अर्धशतकांसह 3853 धावा केल्या आहेत.

कर्णधार म्हणून विराटला टाकू शकतो मागे

रोहितने या मालिकेत 44 धावा पार करताच तो भारताचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरेल. तसेच तो या विक्रमाच्या यादीत विराटला मागे टाकेल. सध्या भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma: दहा वर्षे, 6 ट्रॉफी अन् एक मुंबईचा राजा! MI ची माजी कर्णधार रोहितसाठी इमोशनल पोस्ट

विराटने कर्णधार म्हणून 50 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 1570 धावा केल्या आहेत. तसेच रोहितने 51 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत कर्णधार म्हणून 1527 धावा केल्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी आहे. त्याने 72 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 1112 धावा केल्या आहेत.

षटकारांचे द्विशतक करण्याची संधी

रोहितने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत 18 षटकार मारले, तर तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 200 षटकार मारणारा पहिलाच खेळाडू ठरेल. त्याने सध्या 148 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 182 षटकार मारले आहेत. सध्या तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com