Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India: निवृत्तीनंतरही मैदानात परतणार टीम इंडियाचे 'हे' दोन धाकड खेळाडू

International League T20 Dubai: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियातून निवृत्त झालेले दोन खेळाडू पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहेत

दैनिक गोमन्तक

International League T20 Dubai: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियातून निवृत्त झालेले दोन खेळाडू पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहेत. या खेळाडूंनी टीम इंडियासाठी 2007 चा T20 विश्वचषक आणि 2011 चा विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत, इतकेच नाही तर टीम इंडियासाठी या स्पर्धा जिंकण्यात या खेळाडूंचा मोठा वाटा होता. हे खेळाडू टी-20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत.

हे खेळाडू मैदानात परतणार आहेत

भारतीय संघाचे माजी खेळाडू रॉबिन उथप्पा आणि युसूफ पठाण पुन्हा एकदा मैदानात आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे दोन्ही खेळाडू यावेळी दुबईच्या इंटरनॅशनल लीग टी-20 (ILT20 2023) मध्ये दिसणार आहेत. दुबई कॅपिटल्सने या दोन्ही खेळाडूंचा आपल्या संघात समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय लीग T20 चा पहिला सीझन जानेवारीमध्ये खेळवला जाणार आहे.

भारतासाठी विश्वचषक जिंकला

2007 चा T20 विश्वचषक आणि 2011चा एकदिवसीय विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघांचा भाग असलेल्या 42 वर्षीय युसूफ पठाणने सोशल मीडियावर लीगमध्ये सामील झाल्याची माहिती दिली. 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि IPL सोडल्यानंतर, पठाण लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये सामील झाला. भिलवाडा किंग्जचे प्रतिनिधित्व करताना पठाणने 7 सामन्यात 30.66 च्या सरासरीने 48 च्या सर्वोच्च स्कोअरसह एकूण 184 धावा केल्या होत्या.

नुकतीच निवृत्ती जाहीर केली

रॉबिन उथप्पाने 14 सप्टेंबर 2022 रोजी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. रॉबिन उथप्पा 2007 च्या टी-20 विश्वचषक संघाचा भाग होता. उथप्पाने 2006 साली टीम इंडियात पदार्पण केले. त्याने टीम इंडियासाठी (Team India) 46 एकदिवसीय आणि 13 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने 25.94 च्या सरासरीने 934 धावा केल्या, तर टी-20 मध्ये त्याने 24.9 च्या सरासरीने 249 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT