Team India: भारतीय चाहत्यांसाठी मोठी बातमी, अचानक फॉर्ममध्ये परतला 'हा' मॅच विनर!

India vs Bangladesh 1st Test: भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

India vs Bangladesh 1st Test: भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. पहिल्या दिवशी भारताच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूने धडाकेबाज खेळी करत सर्वांची मने जिंकली. या खेळाडूने स्वबळावर भारताला पहिल्याच दिवशी मजबूत स्थितीत नेले आहे. चला जाणून घेऊया या खेळाडूबद्दल...

या खेळाडूने आपली ताकद दाखवून दिली

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सलामीवीर शुभमन गिल आणि केएल राहुलला मोठी खेळी खेळता आली नाही. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या चेतेश्वर पुजाराने शानदार खेळी केली. त्याने तूफान फटकेबाजी केली. पुजारामुळे टीम इंडियाला पहिल्या दिवशी 278 धावा करता आल्या.

Team India
Team India: धक्का! टीम इंडियाच्या 'या' धाकडने हॉस्पिटलमधून दिली मोठी अपडेट

शतक हुकले

चेतेश्वर पुजारा बराच काळ खराब फॉर्मशी झुंजत होता. पण बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 95 धावांची तूफानी खेळी केली, ही टीम इंडियासाठी चांगली गोष्ट आहे, पण त्याचे शतक हुकले. त्याला तैजुल इस्लामने क्लीन बोल्ड केले. पुजारासाठी हा फॉर्म कायम राखणे खूप महत्त्वाचे आहे, कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळण्यासाठी टीम इंडियाला पुढील 5 कसोटी सामने जिंकणे खूप महत्त्वाचे आहे.

Team India
Team India कडून तब्बल 12 वर्षांनी मिळणार कसोटी खेळण्याची संधी, गोलंदाज म्हणतोय...

पुजारा 100 कसोटी सामने खेळण्याच्या उंबरठ्यावर

चेतेश्वर पुजाराने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. त्याने टीम इंडियासाठी 96 कसोटी सामन्यांमध्ये 6792 धावा केल्या आहेत ज्यात 18 शतकांचा समावेश आहे. तो भारताकडून 100 कसोटी सामने खेळण्यापासून फक्त 4 कसोटी सामने दूर आहे. त्याने भारतासाठी 5 वनडेही खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Team India Bilateral Series Before World Cup 2027
Team India World Record
India Women Cricket Team Enters Asian Games Final
WTC Points Table Team India Qualification Scenario
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com