क्रिकेट (Cricket) हा जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि आवडता खेळ आहे आणि क्रिकेटपटूंचे (Cricketers ) मोठ्या संख्येने जगाच्या कानाकोपऱ्यात चाहते आहेत. बहुतेक चाहते त्यांच्या आवडत्या प्लेयरसाठी वेडे आहेत आणि त्यांच्या आवडत्या खेळाडूला मैदानावर खेळताना पाहणे हे त्यांचे सर्वात मोठे स्वप्न असते. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा एक असा क्रिकेटपटू आहे, ज्याचे फॅन फॉलोइंग जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. पाकिस्तानातही टीम इंडियाच्या या स्टायलिश खेळाडूचे हजारो चाहते आहेत. आणि आता विराटच्या फॉलोअर्समध्ये पाकिस्तानच्या रिझला रेहानचे नावही जोडले गेले आहे. (Rizla Rehan Virat Kohli's Pakistani fan)
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली निःसंशयपणे जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. जगभरात त्याचे प्रचंड चाहते आहेत. कोहलीचे चाहते त्याचे प्रेम आणि कौतुक सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.तसेच आपला कप्तान कोहली मुलींमध्ये देखील खूपच प्रसिद्ध आहे. 2019 च्या वर्ल्ड कप दरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अशीच एक फॅनगर्ल. ती होती रिझला रेहान (Rizla Rehan). रिजला ही एक पाकिस्तानी (Pakistani Fan) मुलगी आहे जी 'मुझे विराट दे दो ' म्हणत व्हायरल झाली आहे.
रिझला रेहान ही क्रिकेटची मोठी चाहती आहे आणि 2018 मध्ये दुबईत झालेल्या आशिया कप दरम्यान ती पहिल्यांदा दिसली होती. भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी रिझला 2019 च्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या अगदी आधी मँचेस्टरमध्ये उपस्थित होती. तिला पाहून सर्वांना आश्चर्य देखील वाटले होते . भारताच्या न्यूझीलंडशी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्याआधी एका मुलाखतीत रिझलाने दावा केला होता की ती पाकिस्तान अंतिम चारमध्ये पोहोचेल या आशेने तिने आधीच दुबई तिकिटे खरेदी केले होते.
2019 च्या विश्वचषकादरम्यान एका मुलाखतीत रिझलाला विचारण्यात आले की भारतीय क्रिकेट संघाकडून तिला पाकिस्तानला भेट देण्याची कोणती गोष्ट आवडेल? यावर रिझलाने उत्तर दिले, "मला विराट द्या, कृपया मला विराट द्या." भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध हरला. पावसामुळे दोन दिवस चाललेल्या त्या सामन्यात टीम इंडियाचा टॉप ऑर्डर पूर्णपणे कोसळला होता . महेंद्रसिंग धोनी धावबाद होताच टीम इंडियाच्या आशा संपल्या होत्या कारण तो सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.