Riyan Parag  Twitter / @rajasthanroyals
क्रीडा

Riyan Parag: रियान परागचा 'जलवा'; बॉल आणि बॅटने चमत्कार करुन ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

Riyan Parag Seven Consecutive Fifties: आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा आसामचा युवा क्रिकेटर रियान पराग सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

Manish Jadhav

Riyan Parag Seven Consecutive Fifties: आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा आसामचा युवा क्रिकेटर रियान पराग सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे.

या स्पर्धेत आसाम संघाचे नेतृत्व करताना परागने अप्रतिम कामगिरी करत आपल्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत नेले. मागील सामन्यातच रियानने सलग सहा अर्धशतके झळकावून विश्वविक्रम केला होता. आता त्याने सलग सातव्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे.

या स्पर्धेत त्याने 11 विकेट्सही घेतल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत त्याने अष्टपैलू म्हणून स्वत:ला सिद्ध केले असून टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला आहे.

संघाला उपांत्यपूर्व फेरीत नेले

दरम्यान, रियान परागने या स्पर्धेतील आठव्या सामन्यात सातवे अर्धशतक ठोकले आहे. पहिल्या सामन्यात त्याला 45 धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आहे.

रियानच्या नेतृत्वाखाली आसामने मंगळवारी बंगालविरुद्ध शानदार विजय मिळवला. त्याच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर आसामने बंगालचा 8 गडी राखून पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

या सामन्यात 50 धावांच्या नाबाद खेळीसोबतच रियानने 4 षटकात 23 धावा देत 2 बळीही घेतले. रियान पराग व्यतिरिक्त, जगातील कोणालाही टी-20 क्रिकेटमध्ये (Cricket) सलग 6 अर्धशतकं झळकावता आलेली नाहीत.

SMAT 2023 मध्ये रियान परागची कामगिरी

बंगालविरुद्ध 50 नाबाद (उपांत्यपूर्व फेरी)

केरळविरुद्ध नाबाद 57

हिमाचल प्रदेशविरुद्ध 72

चंडीगडविरुद्ध 76

सिक्कीमविरुद्ध नाबाद 53

सर्विसेजविरुद्ध नाबाद 76

बिहारविरुद्ध 61

ओडिशावरुद्ध 45

अप्रतिम फलंदाजी

रियान परागने या स्पर्धेतील आठ सामन्यांमध्ये बॉल आणि बॅट दोन्हीसह आश्चर्यकारक कामगिरी केली. फलंदाजीच्या जोरावर त्याने आठ डावांत सात अर्धशतकांसह 490 धावा केल्या. त्याने बॉलनेही चमत्कार केला.

शानदार गोलंदाजी करत त्याने 11 विकेट्स घेतल्या. त्याचा अप्रतिम फॉर्म म्हणजे त्याने आपल्या कामगिरीने टीम इंडियाचे (Team India) दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केल्याचे द्योतक आहे. यापूर्वी त्याने विजय हजारे ट्रॉफी, देवधर ट्रॉफी आणि इमर्जिंग आशिया कपमध्येही चमकदार कामगिरी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT