IND-W vs SL-W: शेफाली-ऋचा अपयशी, पण हरमनप्रीत चमकली! चौकार-षटकारांचा पाडला पाऊस; झंझावती खेळीने सावरला टीम इंडियाचा डाव VIDEO

Harmanpreet Kaur 68 Runs: श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाचव्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने गर्दा केला.
Harmanpreet Kaur 68 Runs
harmanpreet kaurDainik Gomantak
Published on
Updated on

Harmanpreet Kaur 68 Runs: श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाचव्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने गर्दा केला. सुरुवातीच्या पडझडीनंतर भारतीय संघ संकटात असताना हरमनप्रीतने मैदानावर उतरुन केवळ डावच सावरला नाही, तर श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. हरमनप्रीतने 43 चेंडूंमध्ये 68 धावांची धमाकेदार खेळी खेळून टी-20 क्रिकेटमधील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला.

सुरुवातीची पडझड आणि कर्णधाराचा लढा

नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. विस्फोटक सलामीवीर शेफाली वर्मा अवघ्या 5 धावा करुन तंबूत परतली, तर जी. कमलिनी देखील 12 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाली. अवघ्या 27 धावांवर 2 विकेट्स गमावल्यामुळे भारतीय संघ दबावाखाली होता. अशा परिस्थितीत कर्णधार हरमनप्रीत कौर क्रीझवर आली. एका बाजूने विकेट्स पडत असताना हरमनप्रीतने संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख मेळ घातला. हरलीन देओल (13) आणि ऋचा घोष (5) स्वस्तात बाद झाल्या तरी हरमनप्रीतने आपला नैसर्गिक खेळ सुरु ठेवला.

Harmanpreet Kaur 68 Runs
IND W vs NZ W: न्यूझीलंडविरुद्ध भारतीय ओपनर्सचा डबल धमाका! स्मृती मानधना-प्रतिका रावलने ठोकले शतक, रचला नवा इतिहास! VIDEO

कर्णधार खेळी: 35 चेंडूत अर्धशतक

हरमनप्रीतने अवघ्या 35 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर तिने अधिक आक्रमक पवित्रा घेतला. तिने एकूण 43 चेंडूंचा सामना करताना 158.14 च्या स्ट्राइक रेटने 68 धावा कुटल्या. या खेळीत तिने 9 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकार लगावला. तिच्या या खेळीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.

Harmanpreet Kaur 68 Runs
IND W vs IRE W: स्मृती-प्रतिकाचं वादळ! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदा ओलांडला 400 धावांचा टप्पा

अरुंधती रेड्डीचा अखेरच्या षटकांत धमाका

हरमनप्रीत बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये अरुंधती रेड्डीने मैदानावर धुमाकूळ घातला. अरुंधतीने अवघ्या 11 चेंडूंमध्ये 27 धावांची वादळी खेळी खेळली. 245.45 च्या स्ट्राइक रेटने खेळताना तिने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. अरुंधतीच्या या फटकेबाजीमुळे धावसंख्येला वेग मिळाला. तिला अमनजोत कौरने 18 चेंडूत 21 धावा करुन चांगली साथ दिली. या सामूहिक प्रयत्नांमुळे भारतीय महिला संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 175 धावांचा डोंगर उभा केला.

दुसरीकडे, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीला वर्चस्व गाजवले, मात्र हरमनप्रीत आणि अरुंधतीच्या आक्रमणापुढे त्यांचा निभाव लागला नाही. 176 धावांचे लक्ष्य गाठणे श्रीलंकेसाठी सोपे नसणार आहे, विशेषतः भारताच्या मजबूत फिरकी गोलंदाजीसमोर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com