

वेर्णा: सांकवाळ येथील उपासनानगर परिसरात एका महिलेसह तिच्या कुटुंबावर झालेल्या भीषण हल्ल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी मोठी कारवाई केली. सोमवारी 29 डिसेंबर) संध्याकाळी घडलेल्या या खळबळजनक घटनेत पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर विनयभंग, प्राणघातक हल्ला आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुस्मिता दास (वय 24) ही 29 डिसेंबर रोजी संध्याकाळी उशिरा तिचे पती आणि नणंद यांच्यासह घरी परतत होती. ते उपासनानगर परिसरात पोहोचले असता, आरोपींनी त्यांचा रस्ता अडवला. त्यानंतर आरोपींनी सुस्मिता आणि तिच्या कुटुंबाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
तक्रारीनुसार, आरोपींनी सुस्मिताला चुकीच्या पद्धतीने रोखून धरले आणि तिच्याशी गैरवर्तन केले. यातील एका मुख्य आरोपीवर सुस्मिताचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आला. जेव्हा तिचे कुटुंब तिला वाचवण्यासाठी पुढे आले, तेव्हा आरोपींनी तिच्या नणंदेलाही बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर, एका आरोपीने सुरा काढून पीडित कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली.
घटनेनंतर पीडित महिलेने वेर्णा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली आणि या हल्ल्यात सामील असलेल्या चारही आरोपींना अटक केली. या सर्वांविरुद्ध 'भारतीय न्याय संहिता, 2023' (BNS) च्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींची (Accused) ओळख पटवण्याचे आणि या हल्ल्यामागचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.
वर्षाच्या शेवटच्या दिवसांत गोव्यात पर्यटकांची आणि स्थानिकांची मोठी गर्दी असते. अशा वेळी भरवस्तीत एका महिलेवर (Women) आणि तिच्या कुटुंबावर झालेला हा हल्ला सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. वेर्णा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, आरोपींना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.