

भारतीय क्रिकेटसाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. एका बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताने कोरलेले नाव आणि दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा व विराट कोहली या दोन दिग्गजांनी कसोटी क्रिकेटला केलेला अलविदा, अशा अनेक भावनांनी हे वर्ष भरलेले होते. मात्र, या सर्व घडामोडींत चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की, २०२५ मध्ये बॅटिंगच्या मैदानात बाजी कोणी मारली?
विराट कोहलीसाठी २०२५ हे वर्ष त्याच्या जुन्या फॉर्मची आठवण करून देणारे ठरले. त्याने या वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून एकूण १४ सामने खेळले. १५ डावांमध्ये त्याने ५६.१६ च्या प्रभावी सरासरीने ६७४ धावा फटकावल्या. विशेषतः दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत त्याने लागोपाठ दोन अर्धशतके झळकावून आपण अजूनही 'चेस मास्टर' असल्याचे सिद्ध केले. विराटने या वर्षात ३ शतके आणि ४ अर्धशतके झळकावून धावांची टांकसाळ सुरू ठेवली.
दुसरीकडे, 'हिटमॅन' रोहित शर्माने केवळ फलंदाज म्हणून नव्हे, तर एक यशस्वी कर्णधार म्हणूनही छाप पाडली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. रोहितनेही या वर्षात १४ सामने खेळले असून ५० च्या सरासरीने ६५० धावा केल्या. रोहितच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची आक्रमकता. त्याने या वर्षात ६९ चौकार आणि २४ उत्तुंग षटकार खेचले. बाउंड्री मारण्याच्या बाबतीत रोहितने विराटला मागे टाकले आहे.
वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विचार केला तर विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची येथे १३५ धावांची जबरदस्त खेळी केली. तर रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नाबाद १२१ धावांची झुंजार खेळी साकारली. विराटने जिथे शतकांच्या संख्येत (३ शतके) आघाडी घेतली, तिथे रोहितने (२ शतके) आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन केले.
या वर्षातील सर्वात मोठी बातमी म्हणजे या दोन्ही खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय क्रिकेटमधील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असला, तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये या दोघांची धार अजूनही कायम आहे. एकूणच, धावांच्या बाबतीत विराट थोडा पुढे असला, तरी षटकार आणि जेतेपदाच्या बाबतीत रोहितने २०२५ गाजवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.