Rishabh Pant IPL Comeback Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant : रिषभ पंतबाबत मोठी बातमी! 'या' क्रमांकावर करणार फलंदाजी; जबाबदार खेळी करण्याचे असणार आव्हान

Rishabh Pant IPL Update: सध्या पंत हा फक्त भारतीय कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे. एकदिवसीय प्रकारात त्याला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संधी मिळते, तर के. एल. राहुल मुख्य यष्टीरक्षक-फलंदाजाची भूमिका बजावतो.

गोमन्तक डिजिटल टीम

भारताच्या टी-२० संघातून बाहेर पडलेला रिषभ पंत याच्यासाठी आगामी आयपीएल मोसम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यंदा Indian Premier League स्पर्धेत तो लखनौ सुपरजायंट्सकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. यापूर्वी तो चौथ्या क्रमांकावर खेळत होता.

सध्या पंत हा फक्त भारतीय कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे. एकदिवसीय प्रकारात त्याला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संधी मिळते, तर के. एल. राहुल मुख्य यष्टीरक्षक-फलंदाजाची भूमिका बजावतो. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपले स्थान परत मिळवण्यासाठी पंतसमोर मोठे आव्हान आहे.

यंदाचा आयपीएल मोसम त्याच्यासाठी ‘करो या मरो’ असा ठरण्याची शक्यता आहे. सातत्यपूर्ण आणि प्रभावी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देणे त्याच्यासाठी आवश्यक ठरणार आहे. विशेषतः मधल्या फळीत आक्रमक आणि जबाबदार खेळी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.

पंतने या मोसमात चांगली कामगिरी केल्यास त्याच्या टी-२० संघात पुनरागमनाच्या आशा बळावतील, अन्यथा त्याचे स्थान आणखी कठीण होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT