Rishabh Pant Health Update: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतशी संबंधित एक मोठी अपडेट समोर येत आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या कार अपघातात ऋषभ गंभीररित्या जखमी झाला होता.
आता पंतच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही. खुद्द पंतने त्याच्या चाहत्यांना ही मोठी अपडेट दिली आहे.
ऋषभ पंतने (Rishabh Pant) आज (7 फेब्रुवारी) त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला पंतने भावनिक कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले की, 'बाहेर बसून ताज्या हवेत श्वास घेणे... इतके चांगले वाटले हे कधीच कळले नव्हते.'
इनसाइड स्पोर्टच्या बातमीनुसार, हा फोटो ऋषभ पंतच्या घराचा असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 4 जानेवारीपासून तो मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल होता.
25 वर्षीय ऋषभ पंत 30 डिसेंबरच्या सकाळी आपल्या आईला भेटण्यासाठी दिल्लीहून रुरकीला जात होता. याचदरम्यान त्याची कार दुभाजकाला धडकली. बांगलादेशचा दौरा आटोपून तो मायदेशी परतला होता. पंतला क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी अजून वेळ लागेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवळपास एक महिन्यात त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागेल. दुसरी शस्त्रक्रिया कधी होणार हे डॉक्टर ठरवतील.
2022 मध्ये ऋषभ पंतने टीम इंडियासाठी (Team India) एकूण 7 सामने खेळले होते. यादरम्यान त्याने 61.81 च्या सरासरीने 680 धावा केल्या. दुसरीकडे, पंतने गेल्या वर्षी भारतासाठी 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 37.33 च्या सरासरीने 336 धावा केल्या होत्या.
दुसरीकडे, T20 बद्दल बोलायचे झाल्यास, या फॉरमॅटमध्ये त्याने गेल्या वर्षी 25 सामने खेळताना 21.41 च्या सरासरीने केवळ 364 धावा केल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.