Rishabh Pant  Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant: "कधीकधी तुम्ही..." आयपीएलच्या तोंडावर रॉबिन उथप्पाने पंतला का केली विनंती?

Robin Uthappa: पंतची IPL मधील कामगिरी 2024 T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघातील त्याचे स्थान निश्चित करेल.

Ashutosh Masgaunde

Robin Uthappa On Rishabh Pant's Comeback:

भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाने असे मत व्यक्त केले आहे की, दुर्दैवी कार अपघातानंतर ऋषभ पंतच्या घाईघाईने पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात त्याच्या दुखापती आणखी वाढू शकतात.

पंत क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. तो त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत आहे. त्याने आगामी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) साठी फलंदाजी, नेतृत्व आणि यष्टीरक्षण करण्याची इच्छा व्यक्त केली असताना, संगाने अलीकडेच स्पष्ट केले की, पंत स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात फक्त फलंदाज म्हणून सहभागी होईल.

15 महिन्यांहून अधिक काळ क्रिकेटच्या मैदानाबाहेर असलेल्या पंतची IPL मधील कामगिरी 2024 T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघातील त्याचे स्थान निश्चित करेल. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाच्या वेळी त्याच्या प्रत्येक हालचालीवर संघ व्यवस्थापनाची नजर असणार आहे.

उथप्पाला असेही वाटते की, पंतने राष्ट्रीय संघात परत येण्यासाठी घाईघाईने प्रयत्न करू नये. पंत आधीच 2022 मध्ये गुडघ्याच्या दुखापतीशी झुंजत होता, अपघातादरम्यान झालेल्या आघातामुळे ती दुखापत अधिकच बिघडली आहे.

"रिषभ पंतसाठी गेले दिड वर्ष कठीण होते. तो या परिस्थितीतून कसा सावरतो यावर सर्व अवलंबून आहे. त्याच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी तो नेटमध्ये परतला आहे, तो चेंडू चांगला मारतोय, सेंटर विकेटकीपिंगचा सराव करत आहे हे पाहून आनंद झाला आहे. त्याने पुनरागमनाच्या प्रक्रियेत घाई करू नये अन्यथा या घाईमुळे त्याला आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे," असे उथप्पाने इनसाइडस्पोर्टशी संवाद साधताना सांगितले.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले आहे. यंदा गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ पहिल्या सामन्यात खेळणार आहे. हा सामना 22 मार्च रोजी त्याच्या घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (RCB) होणार आहे.

चेन्नईचा संघ विक्रमी नवव्यांदा आयपीएलच्या मोसमातील पहिला सामना खेळणार आहे. यापूर्वी, संघाने 2009, 2011, 2012, 2018, 2019, 2020, 2022 आणि 2023 मध्ये उद्घाटन सामना खेळला आहे.

दरम्यान देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे पहिल्या 21 सामन्यांचेच वेळापत्रक जाहीर झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT