भारत विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी मालिकेतील पाचवा सामना ७ मार्चपासून सुरू होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत रोहित शर्माने इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटच्या कमेंटवर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
डकेटने यापूर्वी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या खेळण्याबद्दल मत व्यत्त केले होते. जयस्वालने या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत द्विशतकी खेळी केली होती. त्यावेळी डकेट म्हणाला होता की जयस्वाल ज्या आक्रमकतने खेळतो, ते पाहून बझबॉललाही थोडे श्रेय दिले पाहिजे.
इंग्लंड संघाने कसोटीत ब्रेंडन मॅक्युलम प्रशिक्षक झाल्यापासून आक्रमक पवित्रा स्विकारला आहे. त्यामुळे तेव्हापासून त्यांच्या या प्रकारच्या खेळण्याला बझबॉल म्हणून ओळखले जाते.
डकेट म्हणाला होता, 'जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू अशाप्रकारे खेळताना पाहाता, तेव्हा असे वाटते की आम्हीही याचे थोडे श्रेय घ्यायला हवे की बाकीजण जसे कसोटी क्रिकेट खेळतात त्यापेक्षा ते थोडे वेगळे खेळत आहेत. बाकी खेळाडू आणि संघही आक्रमक पद्धतीचे क्रिकेट खेळत असल्याचे पाहून उत्सुकता वाटत आहे.'
डकेटच्या या वक्तव्याबद्द रोहितने पाचव्या कसोटीच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले, 'आमच्या संघात ऋषभ पंत नावाचा एक खेळाडू होता, कदाचित बेन डकेटने त्याला खेळताना पाहिलेले नाही.'
'बझबॉल म्हणजे काय मला माहित नाही. मी कोणाकडूनही अतिशय आक्रमक खेळ पाहिलेला नाही. गेल्यावेळेपेक्षा यावेळी नक्कीच इंग्लंडने भारतात चांगले क्रिकेट खेळले आहे. पण अजूनही मला बझबॉल म्हणजे काय कळालेले नाही.'
दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर पाचव्या कसोटी सामन्याला ७ मार्चला सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.