WPL 2024: बेथ आणि लॉरा जोडीने काढला अख्खा राग, गुजरात जायंट्सनं उघडलं खातं; RCB चा 19 धावांनी पराभव

WPL 2024, Gujarat Giants vs Royal Challengers Bangalore: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स यांच्यात लीगचा 13 वा सामना खेळला गेला.
WPL 2024, Gujarat Giants vs Royal Challengers Bangalore
WPL 2024, Gujarat Giants vs Royal Challengers BangaloreDainik Gomantak

WPL 2024, Gujarat Giants vs Royal Challengers Bangalore: महिला प्रीमियर लीग 2024 चे जवळपास निम्म्याहून अधिक सामने खेळले गेले आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स यांच्यात लीगचा 13 वा सामना खेळला गेला. या सामन्यात गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने आरसीबीविरुद्ध पाच गडी गमावून 199 धावा केल्या होत्या. स्मृती मानधानाच्या आरसीबीला 200 धावांचे विशालकाय लक्ष्य दिले होते. 200 धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 8 गडी गमावून केवळ 180 धावा करता आल्या आणि सामना 19 धावांनी गमावला.

WPL 2024 मधील गुजरातचा हा पहिला विजय आहे. तर बंगळुरुचा हा तिसरा पराभव आहे. गुजरातची कर्णधार बेथ मुनी आणि लॉरा वोल्वार्ड जोडीने शानदार खेळी खेळली. या दोघींच्या दमदार खेळीच्या जोरावर गुजरातने आरसीबीचा 19 धावांनी पराभव केला.

गुजरातची दमदार खेळी

दरम्यान, या सामन्यात नाणेफेक जिंकून बेथ मूनीने पहिल्यांगा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुनीने हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले आणि लॉरा वोल्वार्डच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 13 षटकांत 140 धावांची अप्रतिम सुरुवात केली. या सामन्यात लॉरा वोल्वार्डने 45 चेंडूंचा सामना करत 76 धावांची दमदार खेळी केली.

वोल्वार्डच्या या विस्फोटक खेळीत 13 चौकारांचा समावेश होता. लॉराची विकेट गमावल्यानंतरही दुसऱ्या टोकाकडून कर्णधार बेथ मुनीने बंगळुरुच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरुच ठेवले आणि 51 चेंडूत 85 धावांची शानदार खेळी खेळली. मुनीने आपल्या या खेळीत 12 चौकारांसह 1 षटकारही लगावला.

दुसरीकडे, बेथ मुनी आणि लॉरा वोल्वार्डच्या दमदार खेळीमुळे गुजरात जायंट्सने 20 षटकात 5 गडी गमावून 199 धावा केल्या होत्या. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजीने अत्यंत खराब कामगिरी केली. बंगळुरुच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाने मजबूत धावा दिल्या.

बंगळुरुसाठी, सोफी मोलिनक्स आणि जॉर्जिया वेयरहॅम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती, परंतु या एका विकेटसाठीही त्यांनी 30 पेक्षा जास्त धावा दिल्या. तर गुजरातचे तीन फलंदाज धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले.

WPL 2024, Gujarat Giants vs Royal Challengers Bangalore
WPL 2024: मुंबई इंडियन्सच्या शबनम इस्माईलने लिहिली वेगाची नवी व्याख्या, महिला क्रिकेटमध्ये टाकला सर्वात वेगवान चेंडू

गुजरातचा पहिला विजय

दरम्यान, WPL 2024 मध्ये बॅक टू बॅक मॅच हरल्यानंतर, गुजरात जायंट्सला पाचव्या मॅचमध्ये पहिला विजय मिळाला. याआधी, त्यांचे फलंदाज आणि गोलंदाज म्हणावी तशी कामगिरी करु शकले नाही, परंतु दिल्लीच्या मैदानावर पोहोचताच गुजरात जायंट्सच्या फलंदाजांसह गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आणि हंगामातील पहिला विजय नोंदवला. या विजयानंतर पॉंइंट टेबलमध्ये पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवण्यासाठी बेथ मुनीच्या नेतृत्वाखालील गुजरातला उर्वरित 3 सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.

WPL 2024, Gujarat Giants vs Royal Challengers Bangalore
WPL 2024: 5 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या मेग लॅनिंगचा 'भीम पराक्रम'; T20 मध्ये सर्वात जलद 9000 धावांचा गाठला टप्पा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने निराशा केली

WPL 2024 मध्ये पॉइंट टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या या सामन्यात आधी गोलंदाजांनी आणि नंतर फलंदाजांनी निराशा केली. 200 धावांचा पाठलाग करणाऱ्या बंगळुरु संघाला स्मृती मानधानाच्या रुपाने पहिला धक्का बसला. इंफॉर्म फलंदाज स्मृती मानधना 16 चेंडूत 24 धावा करुन आऊट झाली. अश्ले गार्डनरने तिची विकेट घेतली.

मानधानानंतर सलामीवीर एस मेघनाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु धाव घेण्याच्या प्रयत्नात ती धावबाद झाली. मेघनाने 13 चेंडूत केवळ 4 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सोफी डिव्हाईनही मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरली, तीही 16 चेंडूत 23 धावा करुन तनुजा कंवरच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाली. यासह बंगळुरुचे सामना जिंकण्याचे स्वप्नही स्वप्नच राहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com