Rinku Singh X/BCCI
क्रीडा

IND A vs ENG A: रिंकू सिंगची भारतीय अ संघात एन्ट्री; इंग्लंडविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळणार सामना?

Rinku Singh: रिंकू सिंगचा भारतीय अ संघात प्रथम श्रेणी क्रिकेट मालिकेसाठी समावेश करण्यात आला आहे.

Pranali Kodre

Rinku Singh added to India A squad for four-day match against England Lions:

इंग्लंड लायन्स (अ संघ) आणि इंग्लंडचा वरिष्ठ संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. इंग्लंड लायन्स भारतीय अ संघाविरुद्ध चार दिवसीय प्रथम श्रेणी क्रिकेट मालिका खेळत आहे. दरम्यान, ही मालिका चालू असतानाच बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे.

इंग्लंड लायन्सविरुद्ध चालू असलेल्या मालिकेतील दुसरा चारदिवसीय सामन्यासाठी भारतीय अ संघात 26 वर्षीय रिंकू सिंगचा समावेश करण्यात आला आहे. दुसरा चार दिवसीय सामना 24 जानेवारीपासून अहमदाबादला सुरू होणार आहे.

रिंकू सिंगने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून शानदार कामगिरी केली आहे. तो गेल्या काही महिन्यापासून भारतीय टी२० संघातील नियमित सदस्यही बनला आहे. त्याने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये आयर्लंडविरुद्ध भारताकडून टी२० मध्ये पदार्पण केले होते. तसेच त्याने गेल्यावरीष डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिदा दौऱ्यात वनडेतही पदार्पण केले.

रिंकूला भारतीय अ संघात प्रथम श्रेणी सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिके दौऱ्यादरम्यान पहिल्यांदा संधी मिळाली होती. मात्र, त्यावेळी तो प्लेइंग ११ चा भाग नव्हता. त्यावेळी तो भारताच्या वरिष्ठ कसोटी संघासह ड्रेसिंग रुममध्ये होता, तसेच त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाकडून राखीव क्षेत्ररक्षक म्हणूनही भूमिका बजावली.

आता आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रिंकूला भारतीय अ संघात मिळाली संधी महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे.

उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या रिंकूने आत्तापर्यंत 44 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्याने 57.57 च्या सरासरीने 7 शतके आणि 20 अर्धशतकांसह 3109 धावा केल्या आहेत.

  • इंग्लंड लायन्सविरुद्ध दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारतीय अ संघ - अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, तिलक वर्मा, कुमार कुशाग्र, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, अर्शदीप सिंग, तुषार देशपांडे, विद्वत कवेरप्पा, उपेंद्र यादव, आकाश दीप, यश दयाल, रिंकू सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT