IND vs END: '...त्यानंतरच होईल रोहितच्या नेतृत्वाची पारख', इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी गावसकरांचं भाष्य

Sunil Gavaskar: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रोहित शर्माच्या फलंदाजी आणि नेतृत्वाबद्दल सुनील गावसकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Sharma | Sunil Gavaskar
Rohit Sharma | Sunil GavaskarX/BCCI
Published on
Updated on

Sunil Gavaskar on Rohit Sharma's Batting and Captaincy:

भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी भारत आणि इंग्लंडचे माजी क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिली आहे. यात सुनील गावसकरांचाही समावेश आहे.

गावसकरांनी या मालिकेपूर्वी म्हटले आहे की भारताचा कर्णधार रोहित शर्माकडे फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर मोठ्या धावा करण्याची क्षमता आहे. तसेच त्यांनी कर्णधार म्हणून त्याला एक सल्लाही दिला आहे.

यापूर्वी इंग्लंडने कसोटी मालिका खेळण्यासाठी 2021 मध्ये भारत दौरा केला होता. त्या मालिकेत भारताने 3-1 अशा फरकाने विजय मिळवला होता. त्या मालिकेत रोहित शर्माने 57.50 च्या सरासरीने 345 धावा केल्या होत्या. त्याने चेन्नई कसोटीत 161 धावांची खेळीही केली होती.

Rohit Sharma | Sunil Gavaskar
IND vs ENG: विराट पहिल्या दोन कसोटीतून बाहेर, टीम इंडियाला धक्का; BCCI कडून कारण स्पष्ट

या खेळीची आठवण करून देत गावसकर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले, 'रोहितने फलंदाज म्हणून चेन्नई कसोटीत ज्याप्रकारे फलंदाजी केली होती, त्याने शतकही केले होते. त्याचे हे खूप शानदार शतक होते.'

'त्याने फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी हे दाखवले होते. जर त्याने यापद्धतीने फलंदाजी केली, तर भारताला नक्कीच चांगली सुरुवात मिळेल. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांना फलंदाजी करणे सोपे जाईल.'

याशिवाय रोहितला कर्णधार म्हणूनही गोलंदाजांना योग्य पद्धतीने वापरण्याचा सल्ला गावसकरांनी दिला आहे. त्यांनी सांगितले, 'कर्णधार म्हणून आपल्याला पाहायला लागले. आपल्याला माहित आहे की हैदराबादच्या खेळपट्टीवर कदाचीत फिरकी गोलंदाजीला खूप मदत मिळणार नाही.'

'जर इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांना चांगली सुरुवात मिळाली, जर त्यांनी लंचपर्यंत विकेट गमावली नाही, तर रोहित त्याची गोलंदाजी फळी कशी हाताळतो हे पाहावे लागेल. आपल्याला हे पाहावे लागेल आणि मग त्याच्या नेतृत्वाचे परिक्षण करता येईल.'

Rohit Sharma | Sunil Gavaskar
IND vs ENG: इंग्लंड संघाचे भारतात जोरदार स्वागत, पण 'या' कारणाने पाकिस्तानी मुळचा स्पिनर अडकला युएईत

दरम्यान, रोहित शर्मा कसोटीत इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदाच नेतृत्व करणार आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटीत नेतृत्व केलेले नाही. रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध 9 कसोटी सामने खेळले असून 49.80 च्या सरासरीने 747 धावा केल्या आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड, कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • 25 ते 29 जानेवारी - पहिली कसोटी, मोहाली (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 2 ते 6 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, विशाखापट्टणम (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 15 ते 19 फेब्रुवारी - तिसरी कसोटी, राजकोट (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 23 ते 27 फेब्रुवारी - चौथी कसोटी, रांची (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 7 ते 11 मार्च - पाचवी कसोटी, धरमशाला (वेळ: स. 9.30 वाजता)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com