India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

टेंशन नॉट! भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाच्या संकटावर निघाला तोडला, Super-4 साठी महत्त्वाचा निर्णय

Asia Cup 2023: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामन्यावर पावसाचे सावट आहे, त्यामुळे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pranali Kodre

Reserve Day added India vs Pakistan Asia Cup 2023 Super Four Match:

आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर-4 फेरीला सुरुवात झाली आहे. या फेरीत रविवारी (10 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान संघात सामना खेळवला जाणार आहे. हा सामना कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.

दरम्यान, हवामान अंदाजानुसार श्रीलंकेत येत्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. याच हवामान अंदाजामुळे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुपर-4 सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान सामना पूर्ण झाला नाही, तर 11 सप्टेंबर रोजी हा सामना पूर्ण करण्यात येईल.

या स्पर्धेचे यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केले आहे की जर पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला, तर प्रेक्षकांना त्यांचे तिकीट जपून ठेवावे लागणार आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की केवळ अंतिम सामन्याशिवाय केवळ भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामन्यासाठीच राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. 17 सप्टेंबर रोजी अंतिम सामना रंगणार आहे. या अंतिम सामन्यासाठी 18 सप्टेंबर राखीव दिवस आहे.

दरम्यान, सामन्यांच्या निर्धारित दिवशीच सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, मग षटके कमी करावी लागली तरी. मात्र, तरीही सामना पूर्ण झाला नाही, तर राखीव दिवसाचा वापर करण्यात येईल.

यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक 2023 स्पर्धेतील साखळी फेरीचा सामना पावसामुळेच रद्द झाला होता. पाल्लेकेले येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचा डाव पूर्ण झाल्यानंतर पावसाचा जोर वाढला.

त्यामुळे सामना पुढे खेळवला जाऊ शकला नव्हता. त्याचमुळे सामना रद्द करण्यात आला. भारताने या सामन्यात 48.5 षटकात सर्वबाद 266 धावा केल्या होत्या.

तसेच पाल्लेकेले येथेच नेपाळविरुद्ध झालेल्या भारताच्या दुसऱ्या साखळी फेरी सामन्यादरम्यानही पावसाचा व्यत्यय आला होता. पण डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने 10 विकेट्सने जिंकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT